Download App

मोठी बातमी : दरवर्षी 25 जून ‘संविधान हत्या दिन’ म्हणून पाळला जाणार; मोदी सरकारची घोषणा

PM मोदींचे काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळत येथून पुढे दरवर्षी 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याचे मोठी घोषणा केंद्र सरकारने केली आहे.

  • Written By: Last Updated:

Centre declares June 25 as ‘Samvidhaan Hatya Diwas’ : PM मोदींचे काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळत येथून पुढे दरवर्षी 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस (Samvidhaan Hatya Diwas) म्हणून पाळला जाणार असल्याचे मोठी घोषणा केंद्र सरकारने केली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी यासंदर्भातील अधिसूचनेचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले आहे.

अमित शाहंची पोस्ट काय? 

संविधान हत्या दिवसाबाबत माहिती देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक पोस्ट टाकली आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी आपली हुकूमशाही मानसिकता दाखवत देशात आणीबाणी लादून भारतीय लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला होता. तसेच लाखो लोकांना विनाकारण तुरुंगात टाकले होते. माध्यमांचा आवाज दाबला गेला. या दिवसाचा आणि घटनेचा निषेध म्हणून आता भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून पाळला जाईल असा निर्णय घेतला आहे. हा दिवस 1975 च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करेल असे शाहंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

देशात मोदी सरकार विरोधात आणीबाणीपेक्षाही मोठी लाट, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा

भारतीय इतिहासातील वादग्रस्त निर्णय

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी जाहीर केली. त्यांचा हा निर्णय भारताच्या इतिहासात बराच वादग्रस्त ठरला. आणीबाणीच्या  अंमलबजावणीच्या अनेक कारणांपैकी राजकीय अस्थिरता हे एक कारण असल्याचे सांगितले जाते. आणीबाणीच्या काळात अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात आली होती. प्रेसवर सेन्सॉरशिप लादण्याबरोबरच नागरिकांच्या स्वातंत्र्यावरही मर्यादा लादण्यात आल्या होत्या.

‘या’दिवशी येणार Emergency; खासदार कंगना दिसणार इंदिरा गांधींच्या दमदार भूमिकेत

आणीबाणीनंतर इंदिराजींचा पराभव

आणीबाणीच्या काळात विरोधी पक्षाचे मोठे नेते तुरुंगात होते, पण त्यांनी एकजूट दाखवली. अनेक विरोधी नेत्यांनी रस्त्यावर उतरून राष्ट्रपती भवनाला घेराव घातला, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. आणीबाणी उठवल्यानंतर 1977 मध्ये निवडणुका झाल्या, त्यात इंदिरा गांधींना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यावेळी इंदिरा गांधी स्वतः रायबरेलीमधून निवडणूक हरल्या होत्या.

follow us