‘या’ दिवशी येणार Emergency; खासदार कंगना दिसणार इंदिरा गांधींच्या दमदार भूमिकेत

‘या’ दिवशी येणार Emergency; खासदार कंगना दिसणार इंदिरा गांधींच्या दमदार भूमिकेत

Release date out of Kangana Ranuat Film Emergency : बरोबर आजपासून 50 वर्षांपूर्वी म्हणजे 25 जून 1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशामध्ये आणीबाणी (Emergency) लागू केली होती. त्याच आणीबाणीवर आधारित असलेला अभिनेत्री कंगना रनौत (Kanhana Ranuat) स्टारर ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच निर्मात्यांकडून या चित्रपटाची चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

मोठी बातमी : केजरीवालांचा मुक्काम तुरूंगातच राहणार; दिल्ली HC ची जामीनावर स्थगिती कायम

6 सप्टेंबर 2024 रोजी हा चित्रपट चित्रपट गृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुरुवातीला हा चित्रपट मे महिन्यात रिलीज होणार होता. मात्र लोकसभा निवडणुकीमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं होतं. नुकतच कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटातील तिच्या पात्राचा फोटो शेअर करत प्रदर्शनाची तारिख जाहीर केली आहे.

या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर नुकतीच खासदार झालेली अभिनेत्री करणार नव्हत या चित्रपटांमध्ये इंदिरा गांधी यांची दमदार भूमिका साकारली आहे. तर कंगना या चित्रपटात केवळ अभिनय केला नसून चित्रपटाची निर्मिती देखील कंगनाने केली आहे. त्याबद्दल बोलताना कंगनाने सांगितलं होतं की, हा चित्रपट बनवण्यासाठी तिने तिची संपत्ती गहाण ठेवली आहे. तसेच चित्रपटाची निर्मिती करायला घेतल्यानंतर अनेक अडथळे आले सुरुवातीला मला डेंग्यू झाला त्यानंतर रक्तातील पेशी कमी झाल्या. असंही तिने सांगितलं.

ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पराभवानंतर डेव्हिड वॉर्नरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

हा चित्रपट पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या आणीबाणीच्या काळावर आधारित आहे. ज्यावेळी भारतीय लोकशाही धोक्यामध्ये आली होती. तसेच चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या कंगना रनौतसह अनुपम खेर यांनी जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारली आहे. तर मिलिंद सोमण यांनी फिल्ड मार्शल मानेक शॉ तर मराठमोळा अभिनेता श्रेयश तळपदेने अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज