ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पराभवानंतर डेव्हिड वॉर्नरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
Australian Cricketer David Warner Announces retirement : टी 20 विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाला (Australia) पराभवाचा धक्का बसलेला असताना दुसरीकडे आता ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का बसला आहे तो म्हणजे ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सलामी वीर डेव्हिड वॉर्नर (Devid Warner) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (retirement) घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांना पराभवानंतर आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
नगरला वारं फिरलं! आमदारकीसाठी ‘मविआ’कडे इच्छुकांची गर्दी; कुणाचं पारडं जड?
दरम्यान आजच टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील अत्यंत थरारक सामन्यात अफगाणिस्तानने पुन्हा मोठा उलटफेर केला. धावा कमी असताना गोलंदाजी अन् चिवट खेळाच्या बळावर अफगाणिस्तानच्या खेळाडूंना अनुभवी बांग्लादेशला लोळवलं. या विजयानंतर अफगाणिस्तानने सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. मात्र, बांग्लादेशच्या पराभवाचा सर्वात मोठा धक्का बसला तो ऑस्ट्रेलियाला. बांग्लादेश विजयी झाला असता तरच ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलचं तिकीट मिळालं असतं. मात्र, हा चमत्कार घडलाच नाही अन गतवेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली.
David Warner has retired from international cricket.
– A legendary career comes to an end, Thank You Davey! ❤️ pic.twitter.com/ny4SUiWivG
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 25, 2024
राज्यातील 48 खासदारांना माय मराठीचा अभिमान; 12 खासदारांनी घेतली इंग्रजी अन् हिंदीतून शपथ
वॉर्नरने या अगोदरच एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर आता त्याने टेस्ट क्रिकेटमधून देखील निवृत्ती घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी देखील तो आयपीएल सह इतर लीगमध्ये खेळत राहणार आहे. वॉर्नरच्या करिअरबद्दल सांगायचं झालं तर 2011 मध्ये न्युझीलँड विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाचा प्रतिनिधित्व केलं तशी चढ-उतारांचीच राहिली मात्र टी 20 आणि एक दिवसीय फॉरमॅटमध्ये तो अत्यंत यशस्वी ठरला आयपीएलमध्ये देखील एक यशस्वी फलंदाज म्हणून त्याच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने 2016 ला आयपीएलचा किताब जिंकला होता.