Download App

जीएसटीने सरकारची तिजोरी भरली, महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा

GST Collection: केंद्र सरकारकडे जुलै 2023 मध्ये 1 लाख 65 हजार 105 कोटी रुपये GST मधून जमा झाले आहेत. जुलै 2022 च्या तुलनेत 11 टक्के अधिक आहे. जुलै 2022 मध्ये ते 1 लाख 48 हजार 995 कोटी रुपये होते. जीएसटी अस्तित्वात आल्यापासून ही सलग पाचवी वेळ आहे जेव्हा जीएसटी संकलन 1.60 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.

जुलै 2023 मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र टॉप-5 राज्यामध्ये अव्वल आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात जीएसटी संकलन 18%ने वाढून 26 हजार 064 कोटी रुपये झाले आहे. या यादीत 11 हजार 505 कोटींच्य कलेक्शनसह कर्नाटक दुसऱ्या तर तामिळनाडू 10 हजार 022 कोटींच्या कलेक्शनसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

जीएसटी संकलनात सीजीएसटी (CGST) 29 हजार 773 कोटी रुपये, एसजीएसटी (SGST) रुपये 37 हजार 623 कोटी आणि आयजीएसटी (IGST) रुपये 85 हजार 930 कोटींचा वाटा आहे. यामध्ये वस्तूंच्या आयातीतून 41 हजार 239 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. आणि उपकराद्वारे 11 हजार 779 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. यामध्ये 840 कोटी रुपये वस्तूंच्या आयातीतून वसूल करण्यात आले आहेत.

जीएसटी संकलनाची आकडेवारी जारी करताना अर्थ मंत्रालयाने सांगितले की, सरकारने IGST ते CGST कडे 39 हजार 785 कोटी रुपये आणि SGST कडे 33 हजार 188 कोटी रुपये सेटल केले आहेत. नियमित सेटलमेंटनंतर, जुलै 2023 मध्ये, CGST मधून केंद्राचा महसूल 69 हजार 558 कोटी रुपये आणि SGST मधून राज्यांचा महसूल 70 हजार 811 कोटी रुपये आहे. जुलै 2022 च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये GST संकलनात 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

India-Pakistan peace! बिथरलेला पाकिस्तान नरमला; भारताकडे केली चर्चेची मागणी

गतवर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये देशांतर्गत व्यवहारातून मिळणाऱ्या महसुलात 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे ज्यात सेवांच्या आयातीचा समावेश आहे. जुलै 2023 मध्ये जीएसटी कलेक्शन झाले जेथे ते 1,65,105 कोटी रुपये होते जे जून 2023 पेक्षा जास्त आहे.

जूनमध्ये जीएसटी संकलन 1 लाख 61 हजार 497 कोटी रुपये होते. चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या महिन्यात, एप्रिल 2023 मध्ये जीएसटीचे विक्रमी संकलन झाले होते, तर एप्रिल 2023 मध्ये जीएसटी संकलन 1 लाख 87 हजार 035 कोटी रुपये होते. ऑनलाईन गेमिंगसंदर्भातील कायद्यावर चर्चा करण्यासाठी 2 ऑगस्ट रोजी जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे.

Tags

follow us