Download App

Hariyana Violence : ‘जमावाने दिल्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा’, एफआयआर दाखल…

Hariyana Violence : हरियाणामधील नूहमध्ये घडलेल्या हिंसाचारात 800 जणांच्या जमावाने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्याची माहिती एफआयआरमध्ये देण्यात आली आहे. नूहमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून काढण्यात आलेल्या जलाभिषेक मिरवणुकीमध्ये दगडफेकीची घटना घडली. या दगडफेकीनंतर मोठा हिंसाचार घडला होता. त्यानंतर आता पोलिस ठाण्यात एफआयआर नोंद करण्यात आली आहे.

मी भुजबळांच्या तालमीतला पैलवान, विरोधी पक्षनेते होताच वडेड्डीवार म्हणाले…

पोलिसांनी दिलेल्या एफआयआरमध्ये म्हटले, नल्हारमधील महादेवाच्या मंदिरातून विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने संयुक्त मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीदरम्यान दुसऱ्या एका 800 ते 900 लोकांच्या जमावाकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘अल्लाह हू अकबर’ अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. तसेच मारहाण करण्याच्या उद्दिष्टाने लाठ्या, दगड, बेकायदेशीर शस्त्रे घेऊन मंदिराकडे आगेकूच करण्यात आल्याचं एफआयआरमध्ये म्हटलं आहे.

Assembly Session : आता चिमटे काढण्याच्या भानगडीत पडू नका, विरोधी पक्षनेतेपदी विराजमान होताच वडेट्टीवारांनी भरला दम

तसेच जवळच्या शेतातून महादेवाच्या मंदिरावर हल्लाही करण्यात आला होता. यावेळी शेकडो लोकांनी दगडफेकही केली होती. काठ्या आणि पेट्रोल बॉम्बने हल्ला केल्याचंही एफआयआरमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, हरियाणातील नूहमध्ये जलाभिषेक यात्रेदरम्यान हिंसाचार उफाळून आल्याची घटना घडलीयं. या हिंसाराच्या घटनेनंतर परिस्थितीत नियंत्रण आणण्याचे पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. नूह झालेल्या हिंसाचारानंतर अजूनही तेथे तणावाचे वातावरण आहे. या तणावाचा परिणाम आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे.

नूह व्यतिरिक्त गुडगाव, फरीदाबाद आणि पलवल जिल्ह्यांतील काही भागात परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. मंगळवारी यमुनानगर आणि जिंदसह काही ठिकाणी तुरळक घटना घडल्या. या हिंसाचारात आतापर्यंत दोन पोलिसांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. नूहमधील तणावग्रस्त भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

Tags

follow us