मी भुजबळांच्या तालमीतला पैलवान, विरोधी पक्षनेते होताच वडेड्डीवार म्हणाले…
Assembly Session : मी छगन भुजबळांच्या तालमीत तयार झालेला पैलवान आहे, सत्ताधाऱ्यांकडं 200 आमदार असताना मला ही संधी मिळाल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेड्डीवारांनी छाती ठोकून सांगितलं आहे. राजकारणातल्या राजकीय उलथापालथनंतर अधिवेशनात आज विजय वडेड्डीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर वडेट्टीवार विधासभेत बोलत होते.
वडेट्टीवार म्हणाले, मी भुजबळांच्या तालमीमध्ये तयार झालेला मी पैलवान आहे. लढण्यासाठी सत्ता नव्हे तर सामर्थ्य लागतं. या खुर्चीवर असेपर्यंत इमानदारीने काम करणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या बाजूने २०० आमदार असतांना मला ही संधी मिळालेली आहे. माझ्यावरील जबाबदारी प्रामाणिकपणे निभावणार असल्याचं विजय वडेट्टीवारांनी सांगितलं आहे.
‘तिकडे जाऊ नका, परत इकडेच या’ : वडेट्टीवारांचे अभिनंदन अन् अनेक टोमणे; अजितदादांनाही हसू आवरेना
राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर अजित पवारांनी सत्ताधारी पक्षाला पाठिंबा दिला. अजित पवारांसोबत 35 पेक्षा अधिक आमदार सत्तेत सामिल झाले. या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेताच भाजपने त्यांना खातीवाटपही केली.
अजित पवारांच्या बंडाआधी अजित पवारांकडे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद होतं. तेच सत्ताधारी पक्षामध्ये सहभागी झाल्याने राज्याला विरोधी पक्षनेता नव्हता. ज्या दिवशी अजित पवारांनी बंड केलं त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाड यांचं नाव विरोधी पक्षनेत्यासाठी पुढे करण्यात आलेलं होतं. परंतु संख्येचा विचार केला तर बदलत्या परिस्थितीनुसार काँग्रेसकडे संख्याबळ होतं. त्यामुळे काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होईल, हे निश्चित होतं.