Download App

Haryana Accident: ऐन दसऱ्याच्या दिवशी भीषण अपघात, कार कालव्यात कोसळ्याने 7 जणांचा मृत्यू…

  • Written By: Last Updated:

Haryana Accident: ऐन दसऱ्याच्या दिवशी हरियाणामध्ये भीषण (Haryana Accident) अपघात झाला. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार कालव्यात कोसळून 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

ठरलं! 3 जानेवारीला भेटीला येणार संजय जाधव दिग्दर्शित “ये रे ये रे पैसा 3” 

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. हरियाणातील कैथलमध्ये हा अपघात झाला आहे. कार कालव्यात पडल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि चार मुलींचा समावेश आहे. या कारमध्ये एकूण 9 जण होते. हे कुटुंब दसऱ्याला बाबा राजपुरीच्या मेळाव्याला निघाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले, त्यानंतर कार मुंदरी गावातील कालव्यात पडली.

फ्रान्समध्ये शिक्षण, आयर्लंडचे नागरिक.. जाणून घ्या, कोण आहेत टाटाचे नवे चेअरमन?

दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सांगितले की, या वाहनातील सात जणांचा बुडून मृत्यू झाला. तर कोमल नावाची 12 वर्षांची मुलगी अद्याप बेपत्ता आहे. तिचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेतच. दरम्यान, मृतांमध्ये सतविंदर (50), फिजा (16), रिया (10), रमनदीप (6) चमेली (65) तीजो (45) यांचा समावेश हे. हे सर्व कैथलच्या डीग गावातील रहिवासी असून ते एकाच कुटुंबातील आहेत.

कैथलचे पोलिस उपअधीक्षक ललित कुमार म्हणाले, एका कुटुंबातील आठ जण जत्रेला जात होते. या कुटुंबाची गाडी मुंदरी गावात पोहोचली. यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार कालव्यात पडली. या अपघातात चालकाचा जीव वाचला आहे. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

दरम्यान, पोलिसांनी या घटनेची माहिती मृतांच्या नातेवाईकांना दिली आहे. कालव्यातून कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पीएम मोदींनी केला शोक व्यक्त
कैथलमधील अपघातानंतर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला. त्यांनी पोस्ट करत म्हटलं की, हरियाणामध्ये घडलेला भीषण अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांना या दु:खातून बाहेर येण्याची शक्ती देवो, अशी पोस्ट पंतप्रधान मोदींनी केली.

follow us