ठरलं! 3 जानेवारीला भेटीला येणार संजय जाधव दिग्दर्शित “ये रे ये रे पैसा 3”

  • Written By: Published:
ठरलं! 3 जानेवारीला भेटीला येणार संजय जाधव दिग्दर्शित “ये रे ये रे पैसा 3”

Ye Re Ye Re Paisa 3 : मराठी चित्रपटसृष्टीतएक वेगळी ओखळ निर्माण करणारा ‘ये रे ये रे पैसा’ (Ye Re Ye Re Paisa 3) मल्टिस्टारर चित्रपटचा लवकरच सीक्वेल येत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘ये रे ये रे पैसा 3‘ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

नव्या वर्षात पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट प्रक्षेकांचा मनोरंजन करण्यासाठी येणार आहे. 3 जानेवारी 2025 रोजी ‘ये रे ये रे पैसा 3’ (Ye Re Ye Re Paisa 3) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘ये रे ये रे पैसा 3’ ची अमेय विनोद खोपकर एलएलपी, उदाहरणार्थ निर्मित आणि न्युक्लिअर अॅरो या निर्मिती संस्थांनी निर्मिती केली आहे तर सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ हे या चित्रपटचे निर्माते आहे.

याच बरोबर निनाद नंदकुमार बत्तीन वरदविझार्ड एंटरटेन्मेंट हे सहनिर्माते आहेत. ‘ये रे ये रे पैसा 3’ चे संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शक आहे. तर या चित्रपटाची कथा सुजय जाधव यांची आहे आणि संवाद लेखन अरविंद जगताप यांनी केलं आहे. तर पंकज पडघन आणि अमितराज यांचे दमदार संगीत या चित्रपटाला लाभले आहे. या चित्रपटासाठी सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजात देखील एक गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे.

तर संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात आणि जयवंत वाडकर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय जाधव यांचं दिग्दर्शन असल्याने या चित्रपटात नवीन काहीतरी पाहायला मिळणार आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपटानं तो अनुभव दिला आहे.

नवीन वर्षात सजणार, मराठी परंपरेचा साज, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुप्रतिक्षित संगीत मानापमान!

यापूर्वी देखील ‘ये रे ये रे पैसा’ आणि ‘ये रे ये रे पैसा 2’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचा भरपूर मनोरंजन केला होता. ‘ये रे ये रे पैसा 3’ या चित्रपटात पैसा मिळवण्यासाठीच्या प्रयत्नात भलत्याच गोष्टी घडतात आणि त्यातून होणारी धमाल आता आणखी वेगळी, मनोरंजक होणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात बॉक्स ऑफिसवर धमाल उडवण्यासाठी ‘ये रे ये रे पैसा 3’ सज्ज होत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube