‘ये रे ये रे पैसा 3’ उडवणार बॉक्स ऑफिसवर धमाल, ‘या’ दिवशी होणार रिलीज

‘ये रे ये रे पैसा 3’ उडवणार बॉक्स ऑफिसवर धमाल, ‘या’ दिवशी होणार रिलीज

Ye Re Ye Re Paise 3 : धमाल कॉमेडी आणि मॅडनेस असलेल्या ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर ‘ये रे ये रे पैसा २ या नावानं आलेल्या या चित्रपटाच्या सिक्वेलला देखील प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होत. आता हेच बघता दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी ‘ये रे ये रे पैसा 3’ (Ye Re Ye Re Paise 3) प्रेक्षकांसाठी घेऊन येण्याची घोषणा केली आहे.

‘मानाचि’चा वर्धापनदिन दिमाखात, नाटककार सुरेश खरेंच्या कारकीर्दीचा गौरव 

येत्या दिवाळीमध्ये म्हणजेच १ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर जबरदस्त कॉमेडी आणि धावपळीची धमाल अनुभवता येणार आहे. नुकतंच ‘ये रे ये रे पैसा 3’ चे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. या पोस्टवर प्रेक्षकांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

पैसा मिळवण्यासाठीची धडपड आणि त्यामुळे होणारा गोंधळ असं काहीसं भन्नाट कथानक यापूर्वीच्या दोन्ही चित्रपटात पाहायला मिळालं होतं. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता ‘ये रे ये रे पैसा 3’ मध्ये आणखी काय वेगळी कथा दाखवली जाणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश भोसले अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. उत्तम कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळणार असल्यानं हा चित्रपट प्रेक्षकाचं भरपूर मनोरंजन करणार यात शंका नाही.

“भारताने पाकिस्तानला सन्मान द्यावा, त्यांच्याकडे अणुबॉम्ब”; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य 

अमेय विनोद खोपकर एलएलपी, उदाहरणार्थ निर्मित आणि न्यूक्लियर ॲरो पिक्चर्स या निर्मिती संस्थांचे सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, कुमार मंगत पाठक, ओमप्रकाश भट्ट, नासिर शरीफ यांनी ये रे ये रे पैसा ३ य आगामी चित्रपटाच्या निर्मीतीची धुरा सांभाळली आहे. तर निनाद नंदकुमार बत्तीन या सिनेमाचे सहनिर्माते आहेत.

ये रे ये रे पैसा ३ चं लेखन आणि दिग्दर्शन संजय जाधव यांनी केलं आहे. चित्रपटाची पटकथा संजय जाधव यांचीच आहे, तर संवाद अरविंद जगताप यांनी लिहिले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube