Download App

Himachal Cloud Burst: शिमला-कुल्लूत आकाश फाटले ! पन्नासहून अधिक लोक बेपत्ता

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी झालीय. यात तीन जणांचा मृत्यू झालाय. तर 53 हून अधिक जण बेपत्ता आहे. काही कुटुंबातील सर्वच सदस्य हे बेपत्ता आहेत.

  • Written By: Last Updated:

Himachal Pradesh 53 People missing: केरळच्या वायनाडमध्ये (Wayanad landslide) भूस्खलन होऊन अडिचेशेहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. येथील गावे नकाशावरून नष्ट झाले असून, अजूनही बचावकार्य सुरू आहे. तर तिकडे हिमाचल प्रदेशमध्ये ( Himachal Cloud Burst) बुधवारी, गुरुवारी ढगफुटी झालीय. यात तीन जणांचा मृत्यू झालाय. तर 53 हून अधिक जण बेपत्ता आहे. काही कुटुंबातील सर्वच सदस्य हे बेपत्ता आहेत. एनडीआरएफ (NDRF) पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे.

उत्तर भारतीय महिलांनाही ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ; निरुपम यांच्यावर जबाबदारी सोपवली

शिमला जिल्ह्यातील समेज गावामध्ये ढगफुटी झाली आहे. त्यात पूर्ण गावच उद्धवस्त झाले आहे. गावातील 27 घरे होती. त्या घरातील काही जण वाहून गेले आहेत. तर 36 लोक बेपत्ता आहेत. गावातील शाळा, वीज प्रकल्प वाहून गेले आहेत. तर हायड्रो प्रोजेक्टचे नुकसान झाले आहे. तर याच जिल्ह्यातील गानवी गावातही ढगफुटी झाल्याने चार घरे आणि पूल वाहन गेला आहे. तर मंडी जिल्ह्यातील राजबन गावामध्ये ढगफुटी झाल्यामुळे सात लोक बेपत्ता झाले आहेत. येथील तीन लोकांचे मृतदेह आढळून आला आहे. तर कुल्लू जिल्ह्यातील निरमंड आणि आणि मलाना गावातही ढगफुटी झाली आहे. यात निरमंडमधील बागीपूल येथील साद आणि केदस येथील तीन लोक बेपत्ता झालेले आहेत. बागीपूल येथील एका घरातील पाच जण बेपत्ता आहेत. दोन्ही गावात 16 घरांचे नुकसान झाले आहे. तर वाहनेही वाहून गेली आहे. तर कुल्लू जिल्ह्यातील मणिकर्ण घाटातील वीज प्रकल्पाचे धरण फुटले आहेत. त्यामुळे एक मंदिर आणि घरे वाहून गेले आहेत.

स्वप्नील कुसळेची कांस्य पदकाला गवसणी; CM शिंदेंकडून 1 कोटी रुपयांचं बक्षीस…


राष्ट्रीय महामार्गाला फटका

पार्वती नदीने धोक्याची पातळी गाढली आहे. त्यामुळे बाजारपेठ बंद आहे. तर ब्यास नदीची पाणीपातळी वाढल्याने चंडीगड-मनाली राष्ट्रीय महामार्ग ही ठप्प झाला आहे.

वाहने वाहून गेली

चंबा जिल्ह्यामधील रुपणी गावात ढगफुटी झाल्याने भूस्खलन झाले असून, त्यात पंधरा वाहने गाडले गेले आहेत. या भागातील पिके वाहून गेली आहेत. अनेक महामार्ग ठप्प झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांची आपत्कालीन बैठक

मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी तातडीने आपत्कालीन उच्चसमितीची बैठक गुरुवारी बोलविली होती. आपत्तीग्रस्तांना सर्व ते मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मुख्यमंत्री हे हेलिकॉप्टरने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी निघाले होते. परंतु मुसळधार पावसामुळे ते जाऊ शकले नाहीत.

follow us