Download App

विमानात 1.25 लाख लिटर इंधन अन्… अहमदाबाद विमान अपघातावर गृहमंत्री अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया

Amit Shah On Ahmedabad Plane Crash : गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरूवारी 12 जून दुपारी 1.30 च्या सुमारास एअर इंडियाचे लंडनला जाणारे प्रवाशी

  • Written By: Last Updated:

Amit Shah On Ahmedabad Plane Crash : गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरूवारी 12 जून दुपारी 1.30 च्या सुमारास एअर इंडियाचे लंडनला जाणारे प्रवाशी विमान कोसळले (Ahmedabad Plane Crash). या विमान अपघातामध्ये 240 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर फक्त एक प्रवासी रमेश विश्वास कुमार बचावला आहे. तर आता या दुर्घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अमित शाह आज दिल्लीहून घटनास्थळी दाखल झाले असून यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना विमानात 1.25 लाख लिटर इंधन होते, त्यामुळे कोणालाही वाचण्याची संधी मिळाली नाही. मी घटनास्थळी भेट दिली असून त्या ठिकाणी मृतदेह बाहेर काढण्याचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती अमित शाह यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू किंजरापु, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतरांसोबत अहमदाबाद विमान अपघाताबाबत बैठक घेतली. या बैठकीनंतर अमित शहा यांनी एअर इंडियाच्या विमान AI171 च्या अपघाताबाबत पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अमित शाह म्हणाले की, या घटनेने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. भारत आणि गुजरात सरकारचे सर्व विभाग एकत्र आले असून मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. येथे पोहोचलेल्या सर्व प्रवाशांची डीएनए चाचणीची प्रक्रिया पुढील 2-3 तासांत पूर्ण केली जाईल. ज्यांचे नातेवाईक परदेशात आहेत त्यांना माहिती देण्याची प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे. ते येताच त्यांचे डीएनए नमुने देखील गोळा करण्यात येणार असल्याची माहिती देखील या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. तसेच 1000 डीएनए चाचण्या केल्या जातील. गुजरात फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) आणि नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी एकत्रितपणे काम करतील जेणेकरून कमीत कमी वेळेत डीएनए चाचणी पूर्ण होईल. पडताळणीनंतर मृतदेह संबंधित कुटुंबांना सोपवले जातील. असं देखील शाह म्हणाले.

चमत्कार ! अहमदाबाद विमान अपघातातून विश्वशकुमार रमेश बचावला 

follow us