Ahmedabad Plane Crash : मदत करा, पंतप्रधान मोदींचे निर्देश, अमित शाह गुजरातला रवाना

Ahmedabad Plane Crash : मदत करा, पंतप्रधान मोदींचे निर्देश, अमित शाह गुजरातला रवाना

Amit Shah : गुरुवारी दुपारी गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचे लंडनला जाणारे प्रवासी विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह 230 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. याच बरोबर या विमानात 12 क्रू मेंबर्स देखील असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या घटना स्थळी मदतकार्य सुरु आहे.

तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू (Ram Mohan Naidu) यांच्याशी चर्चा करुन त्यांना अहमदाबादला जाऊन विमान अपघातानंतर बाधितांना सर्वतोपरी मदत मिळावी याची खात्री करण्यास सांगितले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशानंतर गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू गुजरातला रवाना झाले आहे.

Ahmedabad Plane Crash : अपघातग्रस्त विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी

समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी (12 जून) अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचे विमान टेकऑफ झाल्यानंतर लगेच कोसळले. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अहमदाबाद विमानतळाजवळील (Ahmedabad Plane Crash) मेघानीनगरमध्ये (Meghaninagar) ही दुर्घटना घडली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube