Sonam Wangchuk : गेल्या 17-18 दिवसांपासून शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वागंचुक कॉकरोच जनता पार्टी च्या समर्थनार्थ दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत उपोषण करत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सोनम वांगचुक यांच्याकडून करण्यात येत आहे. गेल्या 17-18 दिवसांपासून उपोषण करणारे वांगचुक यांनी आता पंतप्रधान मोदी यांना आपला हट्टीपणा सोडून जनतेचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. आज देशात प्रामाणिकपणाला काहीही किंमत उरलेली नाही. सर्व काही अप्रामाणिकपणावर चालत आहे. परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांपासून ते मतांपर्यंत, सर्व काही विक्रीसाठी उपलब्ध आहे असं म्हटले आहे. द इंडियन एक्सप्रेस हिंदी ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
एका व्यक्तीच्या राजीनाम्याने ही समस्या सुटू शकेल का? या प्रश्नावर बोलताना वांगचुक (Sonam Wangchuk) म्हणाले की, नक्कीच तसे होणार नाही परंतु यामुळे एक उत्तरदायित्व निश्चित करण्याचा मार्ग मोकळा होईल. जोपर्यंत सरकार उत्तरदायित्व निश्चित करत नाही तोपर्यंत मनमानी कारभार आणि अनियंत्रित, सदोष निर्णय घेण्याचे हे चक्र अविरत चालू राहील. हा केवळ शिक्षण व्यवस्थेवरच नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजावर एक डाग आहे. जेव्हा प्रश्नपत्रिका फुटतात , तेव्हा आपण सक्षण डॉक्टर आणि अभियंते मिळण्याची अपेक्षा कशी करु शकतो? असं सोनम वांगचुक म्हणाले. मोदी सरकारने तुमच्याशी थेट किंवा अप्रत्यक्षपणे संपर्क साधला का? यावर बोलताना वांगचुक म्हणाले आतापर्यंत तसे काहीही झालेले नाही. आता आम्ही आमचा आवाज अधिक प्रबळ करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल. जर तसे झाले नाही तर त्याची जबाबदारी केवळ सरकारवरच नाही तर त्या नागरिकांवरही असेल ज्यांनी हा मुद्दा पुरेशा प्रभावीपणे मांडण्यास मदत केली नाही.
पंतप्रधान मोदींना (PM Modi) तुम्हाला कोणता संदेश द्यायचा आहे? लोकांचे म्हणणे ऐकून घेणे हे सरकारच्या दीर्घकालीन हिताचे आहे. त्यांनी ताठर भूमिकेऐवजी संवेदनशील असायला हवे. लोकशाही ही सहानुभूती आणि करुणेवर बहरते, ताठरतेवर नाही. मी त्यांना कधीही वैयक्तिकरित्या भेटलेलो नाही. पंतप्रधानांनी आपला हट्टीपणा सोडून संवेदनशील झाले पाहिजे.
ATS चे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये छापे ; नेमकं कारण काय?
लोकशाही ही करुणा आणि सहानुभूतीवर बहरते, हट्टीपणावर नाही. मी त्यांना कधीही वैयक्तिकरित्या भेटलो नाही, पण मी नक्कीच म्हणेन की लोकांचे म्हणणे ऐकून घेतल्यास सरकारला दीर्घकाळात फायदा होईल.
