Amit Malviya On Congress : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi)टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. त्यांनी कर्नाटकमध्ये (Karnataka)एका जाहीर सभेत मोदींना विषारी साप (poisonous snake)म्हटले आहे. त्यामुळे केवळ कर्नाटकच नव्हे, तर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळल्याची पाहायला मिळत आहे. खरगेंच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सोशल मीडियावर (Social media)अनेकांनी काँग्रेसला अक्षरशः झोडून काढले आहे.
Operation Kaveri : सुदानमधून मायदेशात परतल्यानंतर प्रवासी भावूक
Congress abused Narendra modi 91 times या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने किती वेळा शिवीगाळ केली आहे, याची यादीच भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय (Amit Malviya) यांनी ट्वीटवर शेअर केली दिली आहे.
यामध्ये मौत के सौदागरपासून मोदी तेरी कबर खुदेगी ते विषारी साप इथपर्यंत अश्लाघ्य भाषेत काँग्रेस नेत्यांनी मोदींवर केव्हा, केव्हा आक्षेपार्ह टीका केली याचा सविस्तर तपशील दिला आहे. मालवीय यांनी म्हटलं आहे की, काँग्रेस नेत्यांनी यातून सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांल्याचेही दिसत आहे. हे सगळे काँग्रेस नेते अशिक्षित किंवा अल्पशिक्षित नसून उच्चशिक्षित आहेत. हेही या यादीवरून स्पष्ट होत आहे.
स्वतः सोनिया गांधींनी 2007 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये मोदींना मौत के सौदागर असे संबोधले होते. त्यातून काँग्रेस नेत्यांना मोदींवर टीका करण्यासाठी वेगळीच चालना मिळाली आणि त्यानंतर मोदींना शिवीगाळ करण्याचा जो सिलसिला सुरू झाला, तो मल्लिकार्जुन खरगेंपर्यंत येऊन ठेपला आहे.
मोदींना शिवीगाळ करणाऱ्यांमध्ये मणिशंकर अय्यर, पवन खेडा, रणदीप सुरजेवाला आदी नेत्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर मोदी तरी कबर खुदेगी असल्या घोषणांचाही या शिवीगाळीत समावेश आहे. अनेक शिव्या तर लिहू अथवा बोलूही नयेत, इतक्या खालच्या दर्जाच्या आहेत, अशी घणाघाती टीका अमित मालवीय यांनी केली आहे.