Operation Kaveri : सुदानमधून मायदेशात परतल्यानंतर प्रवासी भावूक
Sudan Conflict : सुदानमध्ये भीषण गृहयुद्ध सुरु असताना त्याठिकाणी अडकलेल्या भारतीयांना (Indians)बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी (operation kaveri)सुरू आहे. दरम्यान, आज (दि.27) परराष्ट्र मंत्री (Minister of Foreign Affairs)एस जयशंकर (S Jaishankar)यांनी सांगितले की, सुदानमधून 246 भारतीय नागरिकांना घेऊन हवाई दलाचे विमान मुंबईत (Mumbai) पोहोचले आहे. यावर अनेक प्रवाशांनी केंद्र सरकार (Central Govt)आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांचे कौतुक केले आहे. गृहयुद्धाचा सामना करणाऱ्या सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दल आरसीएफ यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे.
मुख्यमंत्रिपदाबाबत जयंत पाटील स्पष्टच बोलले; जोपर्यंत आमचा नंबर येत नाही….
सुदानहून भारतात परतलेल्या एक वृद्ध महिला प्रवाशी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्या म्हणाल्या की, भारत एक महान देश आहे. पंतप्रधान मोदी हजार वर्षे जगू दे. त्याचवेळी आणखी निशा मेहतांनीही पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. म्हणाले की, आम्हाला आमच्या देशात परतताना खूप आनंद होत आहे.
#WATCH | Second flight carrying 246 Indian evacuees from Sudan, lands in Mumbai#OperationKaveri pic.twitter.com/4PTRZflZgo
— ANI (@ANI) April 27, 2023
यापूर्वी, भारतीय हवाई दलाच्या दोन वाहतूक विमानांद्वारे 256 भारतीयांना सुदानमधून बाहेर काढण्यात आले होते. INS सुमेधा या नौदलाच्या जहाजातून 278 भारतीयांना बाहेर काढण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत सुदानमधून बाहेर काढण्यात आलेल्या भारतीय नागरिकांची संख्या 780 झाली आहे.
विमानाने मुंबईला रवाना होण्याच्या काही मिनिटांपूर्वी, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ट्विट केले आहे. जेद्दाहमधून भारतीयांना वेगाने परत आणण्याचे आमचे प्रयत्न सार्थकी लागले आहेत.