ADR Report for CM in India : असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने (एडीआर) नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात देशातील मुख्यमंत्र्यांच्या (Richest CM in India) संपत्तीचा खुलासा करण्यात आला आहे. म्हणजेच आजमितीस कोणत्या राज्याचा मु्ख्यमंत्री किती श्रीमंत आहे? त्याच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे? तसेच कोणता मुख्यमंत्री गरीब आहे? याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यादीत एकूण 31 मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीची माहिती देण्यात आली आहे.
या सर्वांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सर्वात गरीब असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसं पाहिलं तर याच राज्यात घुसखोरीचं प्रमाण सर्वात जास्त आहे. बांग्लादेशातील घुसखोर आधी याच राज्यात येतात. येथून बनावट पद्धतीने भारतीय कागदपत्रे तयार करून पुढे देशभरात फैलावतात. या राज्यात भ्रष्टाचारही पराकोटीला पोहोचला आहे. तरी देखील या अहवालानुसार राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सर्वात गरीब आहेत. बॅनर्जी यांच्याकडे आजमितीस फक्त 15 लाख 40 हजार रुपयांचीच संपत्ती असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. हा अहवाल विधानसभा निवडणुकीच्या काळात उमेदवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या संपत्तीच्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे.
देशातील तब्बल 29 मुख्यमंत्री करोडपती ; श्रीमंतीत ‘या’ राज्याचा मुख्यमंत्री नंबर वन
सर्वात गरीब मुख्यमंत्री या पदावर ममता बॅनर्जी अजूनही कायम आहेत. तर सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री या पदावर आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्रबाबू नायडू (Chandrababu Naidu) कायम आहेत. नायडू यांच्याकडे तब्बल 931 कोटी रुपयांची संपत्ती आहे. चंद्रबाबू नायडू यांच्यानंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू (Pema Khandu) दुसऱ्या क्रमांकावर आहेत. खांडू यांच्याकडे एकूण 332 कोटी रुपयांची संपत्ती आहे. देशातील अब्जाधीश मु्ख्यमंत्र्यांचा विचार केला तर नायडू आणि खांडू दोघेच आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Karnataka CM) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा नंबर ममता बॅनर्जी यांच्या आधी आहे. त्यांच्याकडे फक्त 55 लाख रुपयांची संपत्ती आहे.
देशातील या 31 मुख्यमंत्र्यांच्या एकूण संपत्तीचा विचार केला तर त्यांच्याकडे एकूण 1630 कोटी रुपये आहेत. एडीआर रिपोर्टनुसार ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे फक्त 9 ग्रॅम सोने असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी सोन्याचे भाव 43 हजार 837 रुपये प्रती 10 ग्रॅम होते. विशेष म्हणजे बॅनर्जी यांच्याकडे जमीन देखील नाही. इतकेच नाही तर त्यांच्याकडे स्वतःचे हक्काचे घर देखील नाही अशी माहिती त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. पंरतु, त्यांच्या या दाव्यावर भाजपने खोचक टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या परिवाराकडे हरिश मुखर्जी रोडवर 34 नोंदणीकृत संपत्ती आहेत असा दावा भाजपने केला आहे.
प्रत्येक राज्याच्या राजधानीत होणार बालाजी मंदिर; मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडूंची घोषणा