Download App

“पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं घोर उल्लंघन; कठोर कारवाई करा”, केंद्र सरकारचे निर्देश

India Pakistan War : युद्धविराम जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानने (India Pakistan War) भारताच्या जम्मू काश्मीरसह अन्य भागात ड्रोन हल्ले केले. काही तासांतच युद्धबंदी तोडण्याचे काम पाकिस्तानने केले. पाकिस्तानच्या या हल्ल्यांना भारतीय सैन्याने तिखट प्रत्युत्तर दिले. यानंतर आता परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानने युद्धविरामाचं उल्लंघन केल्याचं मान्य केलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी शनिवारी रात्री प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

पाकिस्तानच्या कारवायांची माहिती माध्यमांना देताना मिस्त्री म्हणाले, पाकिस्तानने युद्धविराम तोडला आहे आणि त्याने कराराचे घोर उल्लंघन केले आहे. युद्धविराम तोडण्यासाठी सर्वस्वी पाकिस्तानच जबाबदार आहे. यानंतर आता सैन्याा कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सैन्याकडून सगळ्या घडामोडींवर अत्यंत बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे.

पाकिस्तानने उघडपणे युद्धविरामाच्या कराराचं उल्लंघन केलं आहे जे अत्यंत निंदनीय आहे. मागील काही तासांपासून सातत्याने युद्धविरामाचं उल्लंघन होत आहे. आद संध्याकाळी झालेल्या आपसी सहमतीचंही हे सरळसरळ उल्लंघन आहे. या प्रकाराला सर्वस्वी पाकिस्तानच जबाबदार आहे. त्यामुळे पाकिस्तानने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तत्काळ कार्यवाही करावी अशी अपेक्षा विवेक मिस्त्री यांनी व्यक्त केली.

पाकिस्तान सुधारणार नाहीच! युद्धबंदीनंतर तीन तासांतच ड्रोन हल्ले; श्रीनगरमध्ये ब्लॅकआउट

कच्छमध्ये दहा पाकिस्तानी ड्रोन

गुजरात राज्यातील कच्छमध्येही दहा पाकिस्तानी ड्रोन दिसून आले. या सर्व ड्रोन्सना भारतीय सैन्याने नाकाम केले. जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्येही सैन्याने काही ड्रोन पाडले आहेत. राजस्थानच्या बाडमेरमध्ये एकाच वेळी अनेक ड्रोन दिसून आले. बरनाला मध्ये इमर्जन्सी सायरन वाजवण्यात आले. जम्मूतील नगरोटामध्येही पाकिस्तानी ड्रोन दिसले आहेत. पठाणकोटमध्ये पूर्ण ब्लॅकआउट करण्यात आल आहे. फिरोजपूरमध्येही ब्लॅकआउट केले आहे. प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

पंजाबातील काही जिल्ह्यांत ब्लॅकआउट

पंजाब राज्यातील बरनाला आणि संगरूर जिल्ह्यांत आज रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास ब्लॅकआउट करण्यात आला. होशियारपूरच्या डिप्टी कमिश्नर आशिका जैन यांनी सांगितले की वायूसेनेच्या पठाणकोट आणि आदमपूर बेस येथून मिळालेल्या इनपुट्सच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा ‘ब्लॅक आऊट’ जाहीर करण्यात आला आहे. पंजाब, राजस्थान, गुजरात या राज्यांमधील सीमावर्ती भागातही पाकिस्तानकडून गोळीबार आणि ड्रोन हल्ले केल्याचे वृत्त आहे. मात्र अत्यंत सजग आणि सावध असणाऱ्या भारताच्या लष्कराने या सर्व हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

जम्मूतील उधमपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा ड्रोन हल्ला झाला आहे. यानंतर संपूर्ण शहरात ब्लॅकआउट करण्यात आले आहे. सायरन वाजवण्यात येत आहेत. फक्त श्रीनगरच नाही तर बारामूला आणि बडगाममध्येही गोळीबाराचे आवाज ऐकू आले. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात इनकमिंग एअर रेड अलर्ट जारी करण्यात आला आणि जिल्ह्यात इमर्जन्सी ब्लॅकआउट केले गेले.

“नाहीतर उद्ध्वस्त होऊ..” युद्धविरामासाठी पाकिस्तानची अमेरिकेकडे गयावया; पडद्यामागं काय घडलं?

follow us