Download App

India-Pakistan War : पाकिस्तानला पुन्हा संधी नाहीच! युद्धविरामानंतर माजी लष्करप्रमुख व्यथित…

पाकिस्तानची ही तिसरी वेळ, आता पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाही, असं ट्विट माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी युद्धविरामाच्या निर्णयावर केलंय.

India-Pakistan War : भारत-पाकिस्तानात युद्ध (India-Pakistan War) सुरु असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या मध्यस्थीने युद्धाला पूर्णविराम देण्यात आलायं. या युद्धविरामामुळे भारताचे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे व्यथित झाले असल्याचं दिसून येत आहे. यासंदर्भातील ट्विट मनोज नरवणे यांनी केलंय. पाकिस्तानसंदर्भातील ही तिसरी वेळ असून आता पुन्हा संधी मिळणार नसल्याचं मनोज नरवणे यांनी स्पष्ट केलंय.

माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे ट्विटमध्ये म्हणाले, लष्करी कारवाया थांबवणे, हा निर्णय एक स्वागतार्ह पाऊल आहे. मात्र, यावर कायमस्वरूपी दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी आपण दबाव कायम ठेवला पाहिजे. आपण घटनेवर आधारित प्रतिसाद देत राहू शकत नाही आणि दहशतवादी हल्ल्यांमध्ये जीव गमवू शकत नाही. हा तिसरा स्ट्राइक आहे, भविष्यात यापुढे कोणतीही संधी मिळण्याची शक्यता नाही, असं ट्विट मनोज नरवणे यांनी केलंय.


ब्रेकिंग : भारताविरूद्ध कोणतेही दहशतवादी कृत्य ‘अ‍ॅक्ट ऑफ वॉर’ मानले जाणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय

भारत-पाकिस्तान युद्धात युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्यासह माजी लष्करप्रमुख वी.पी. मलिक यांनीही ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिलीयं. मलिक म्हणाले, पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने कारवाई केलीयं. मात्र, या कारवाईमुळे कोणत्याही प्रकारचा राजनैतिक उपयोग झाला की नाही? हा सवाल आम्ही पुढील भविष्यावर सोडून दिला असल्याचं माजी लष्कर प्रमुख वी.पी. मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
जनरल मलिक 1999 मध्ये कारगिल युद्धात सहभागी होते. त्यावेळी भारत-पाकिस्तान लढाईत विजय मिळवला होता.

follow us