Download App

Kolkata Case : संदीप घोषला दणका! आयएमएने सदस्यत्व केलं निलंबित

कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्रिन्सिपल संदीप घोष यांना दणका बसला आहे.

Kolkata Doctor Case : कोलकाता प्रकरणात मोठी बातमी समोर आली (Kolkata Doctor ) आहे. कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज (RG Kar Medical College) आणि हॉस्पिटलचे माजी प्रिन्सिपल संदीप घोष यांना (Sandip Ghosh) दणका बसला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने त्यांचे सदस्यत्वच निलंबित केले आहे. सीबीआयने महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात संदीप घोषची चौकशी केली होती. तसेच त्यांची लाय डिटेक्टर टेस्टही करण्यात आली आहे.

संदीप घोष यांच्यावर हत्या प्रकरणात कोणताच आरोप नाही. परंतु त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करावा लागत आहे. एका माजी कर्मचाऱ्याने डॉ. घोष यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मृतदेह आणि रुग्णालयात जमा होणाऱ्या बायोमेडिकल कचऱ्याची तस्करी त्यांच्याकडून केली जात होती असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याआधी सीबीआयने घोष यांच्या घरी छापा टाकला होता. येथे त्यांची तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली होती. येथून महत्वाचे पुरावे मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. आतापर्यंत डॉ. घोष यांची 90 तास चौकशी झाली आहे.

मोठी बातमी! कोलकाता रेप प्रकरणातील आरोपी संजय रॉयला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

घटना घडल्यानंतर काही दिवसांनी नैतिक जबाबदारीचा हवाला देत संदीप घोष यांनी राजीनामा दिला होता. परंतु, काही तासांनंतरच बंगाल सरकारने त्यांना कलकत्ता नॅशनल मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे प्रिंसिपल म्हणून नियुक्त केले होते. सरकारच्या या निर्णयानंतर सीएनएमसी कर्मचारी आणि डॉक्टर हत्येचा विरोध करणाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. त्यामुळे कलकत्ता उच्च न्यायालयाला यात हस्तक्षेप करावा लागला. संदीप घोष यांनी दीर्घ सुट्टीवर पाठवण्याचा आदेश देण्यात आला.

न्यायालयाने संदीप घोष यांच्या नियुक्तीवरही सवाल उपस्थित केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून घोष यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर आता इंडियन मेडिकल असोलिएशननेही संदीप घोषला दणका दिला आहे. त्यांची सदस्यता निलंबित करण्यात आली आहे. त्यामुळे आता डॉ. घोष यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोलकाता बलात्कार अन् खून प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपीने वापरलेली गाडी पोलीस आयुक्ताच्या नावावर

follow us