Download App

‘6 जून 1981’ रेल्वेच्या इतिहासातील काळा दिवस, भारतातील सर्वात मोठा आणि जगातील दुसरा मोठा रेल्वे अपघात

Biggest Train Accident in India : ओडिशाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरल्याने अनेकांना जीव गमवावा लागला. मालगाडीची धडक बसल्याने ट्रेनचे सात डबे रुळावरून घसरले. या रेल्वे अपघाताने पुन्हा एकदा त्या रेल्वे अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या, जेव्हा रेल्वेचे 7 बोगी पूल तोडून नदीत घुसल्या होत्या. हा रेल्वे अपघात भारतीय रेल्वेच्या 170 वर्षांच्या इतिहासातील काळे डाग आहे.

6 जून 1981 चा तो काळा दिवस
6 जून 1981 रोजी झालेल्या या रेल्वे अपघाताने देशच नव्हे तर संपूर्ण जग हादरले. हा भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि जगातील दुसरा सर्वात मोठा रेल्वे अपघात म्हणून ओळखला जातो. ओडिशातील रेल्वे अपघाताने पुन्हा एकदा या घटनेची आठवण करून दिली आहे.

6 जून 1981 च्या त्या संध्याकाळी… 9 डब्यांची पॅसेंजर ट्रेन 416DN मानसीहून सहरसाला जात होती. त्यावेळी खगरिया ते सहरसा ही एकमेव ट्रेन होती, त्यावेळी ट्रेन खचाखच भरलेली होती. आतून बाहेरून माणसे भारलेली होती. ज्यांना सीट मिळत नव्हती ते ट्रेनच्या दरवाजा आणि खिडक्यांना लटकत होते. इंजिनच्या पुढे आणि मागे लोक बसले होते. कसे तरी लोक ट्रेनच्या छतावरून प्रवास करत होते.

कोरोमंडल एक्सप्रेस अपघातामुळे 18 गाड्या रद्द, अनेक गाड्यांचे मार्ग बदलले, संपूर्ण यादी येथे पाहा

वादळाने सर्व काही उद्ध्वस्त केले
पाऊस सुरू असताना ट्रेन बदला स्टेशनवरुन पुढे गेली होती. पुढे बागमती नदी होती. गाडी 51 क्रमांकाच्या पुलावरून जाणार होती. मुसळधार पाऊस पडत होता. रुळ निसरडे होते आणि समोरून बागमती नदी दुथडी भरून वाहत होती. चालकाने गाडी पुलावर लावली. काही मिनिटांतच चालकाने अचानक इमर्जन्सी ब्रेक लावला. ब्रेक लावताच 9 पैकी 7 डबे पूल तोडून नदीत घुसले. आरडाओरडा सुरू झाला. बुडालेले प्रवासी मदतीसाठी आरडाओरडा करत होते, मात्र त्यावेळी आरडाओरडा ऐकायला कोणीच नव्हते. मुसळधार पावसामुळे बचावकार्याला काही तास उशीर झाला. तोपर्यंत बरंच काही संपलं होतं.

Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघातात 233 लोकांचा मृत्यू, तर 900 प्रवासी जखमी

800 जणांना जीव गमवावा लागला
अधिकृत आकडेवारीनुसार या दुर्घटनेत सुमारे 300 जणांना जीव गमवावा लागला आहे, परंतु स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की मृतांची संख्या किमान 800 ते 1000 होती. रेल्वेच्या नोंदीनुसार, त्या ट्रेनमध्ये फक्त 500 लोक होते, परंतु नंतर दोन रेल्वे अधिकाऱ्यांनी पीटीआयला एका संभाषणात सांगितले की प्रवाशांची संख्या जास्त होती. नदीत पडलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी अनेक आठवडे लागले. केवळ 286 मृतदेह काढू शकले, अनेकांचा शोध लागला नाही. हा रेल्वे अपघात हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे.

ओडिशामध्ये दोन नाही, तीन ट्रेन धडकल्या ! कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघाताचे मुख्य कारण उघडकीस

अपघात का झाला?
या रेल्वे अपघाताबाबत अनेक थेरी मांडल्या गेल्या. काहींमध्ये गाई-म्हशींचा कळप रेल्वे रुळावर आल्याने चालकाला इमर्जन्सी ब्रेक लावावा लागल्याचे सांगण्यात आले. काहींनी सांगितले की, वादळ आणि पावसामुळे लोकांनी ट्रेनच्या सर्व खिडक्या बंद केल्या होत्या, त्यामुळे जोरदार वादळामुळे सर्व दाब ट्रेनवर पडला आणि बोगी पूल तुटून कालव्यात पडल्या.

Tags

follow us