कोरोमंडल एक्सप्रेस अपघातामुळे 18 गाड्या रद्द, अनेक गाड्यांचे मार्ग बदलले, संपूर्ण यादी येथे पाहा

कोरोमंडल एक्सप्रेस अपघातामुळे 18 गाड्या रद्द, अनेक गाड्यांचे मार्ग बदलले, संपूर्ण यादी येथे पाहा

Train Cancellation: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी मोठा रेल्वे अपघात झाला. कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express accident) आणि बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस रुळावरून घसरून मालगाडीच्या धडकेत 233 प्रवासी ठार झालेत तर 900 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झालेत. या अपघातामुळे या मार्गावर धावणाऱ्या 18 गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. यासोबतच अनेक गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले आहेत.

12864 बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे अनेक डबे बहनगा बाजार येथे रुळावरून घसरले आणि दुसऱ्या रुळावर पडले. रुळावरून घसरलेले हे डबे 12841 शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसला धडकले आणि त्याचे डबेही उलटले. कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरल्यानंतर एका मालगाडीला धडकले आणि मालगाडीलाही दुर्घटनाग्रस्त झाली.

Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघातात 233 लोकांचा मृत्यू, तर 900 प्रवासी जखमी

रद्द केलेल्या गाड्यांची यादी
-12837 हावडा-पुरी एक्सप्रेस (2 जून 2023)
-12863 हावडा-सर एम विश्वेवैय्या टर्मिनल एक्सप्रेस (2 जून 2023)
-12839 हावडा-चेन्नई मेल (2 जून 2023)
-12895 शालीमार-पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस (2 जून 2023)
-20831 शालीमार-संबळपूर एक्सप्रेस (2 जून 2023)
-02837 संत्रागाछी-पुरी विशेष (2 जून 2023)
-222021 सियालदह-पुरी दुरांतो एक्सप्रेस (2 जून 2023)
-12074 भुवनेश्वर-हावडा जन शताब्दी एक्सप्रेस (भुवनेश्वर येथून 03.06.2023 रोजी)
-12278 पुरी-हावडा शताब्दी एक्सप्रेस (पुरीहून 03.06.2023 रोजी)
-12277 हावडा-पुरी शताब्दी एक्सप्रेस (03.06.2023 रोजी हावडाहून)
-12822 पुरी-शालीमार धौली एक्सप्रेस (पुरीहून 03.06.2023 रोजी)
-12821 शालीमार-पुरी धौली एक्सप्रेस (शालिमार येथून ०३.०६.२०२३)
-12892 पुरी-बंगरीपोसी एक्सप्रेस (पुरीहून 03.06.2023 रोजी)
-12891 बांगरीपोसी-पुरी एक्सप्रेस (बंगरीपोसी येथून 03.06.2023 रोजी)
-02838 पुरी-संत्रागाछी स्पेशल ट्रेन (पुरीहून 03.06.2023 रोजी)
-12842 चेन्नई-शालिमार कोरोमंडल एक्सप्रेस (चेन्नई येथून 03.06.2023)
-12509 SMVT बेंगळुरू-गुवाहाटी (02.06.2023 रोजी बेंगळुरूहून)

ओडिशामध्ये दोन नाही, तीन ट्रेन धडकल्या ! कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघाताचे मुख्य कारण उघडकीस

या गाड्या टाटानगर मार्गे धावतील
-22807 संत्रागाछी-चेन्नई एक्सप्रेस (02.06.2023)
-22873 दिघा-विशाखापट्टणम एक्सप्रेस (02.06.2023)
-18409 शालीमार-पुरी श्री जगन्नाथ एक्सप्रेस (02.06.2023)
-22817 हावडा-म्हैसूर एक्सप्रेस (02.06.2023)
-12802 नवी दिल्ली-पुरी पुरुषोत्तम एक्सप्रेस (01.06.2023 रोजी सुरू झालेली ही ट्रेन टाटा-केंदुझारगड मार्गे धावेल)
– 18478 ऋषिकेश-पुरी कलिंग उत्कल एक्सप्रेस (1 जून रोजी सुरू झालेली ही ट्रेन टाटा-केंदुझारगड मार्गे धावेल)
-12815 पुरी-आनंद विहार नंदनकानन एक्स्प्रेस (3 जून रोजी जाखापुरा-जरोली मार्गे धावेल)
– 08415 जलेश्वर-पुरी स्पेशल (3 जूनला जलेश्वरहून निघालेली ही ट्रेन जलेश्वरऐवजी भद्रकहून निघेल)

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube