Iran-America War : इराण-अमेरिका युद्धाच्या (Iran-America War) पार्श्वभूमीवर शांतता करार होण्याच्या मार्गावर असतानाच आता पुन्हा एकदा दोन्ही एकमेकांना भिडले आहेत. अमेरिकेने इराणवर हल्ले केल्यानंतर आता इराणकडून अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. इराणने अमेरिकेच्या 18 लष्करी तळांवर हल्ले केले असून यामध्ये कुवेतच्या अलीअल सलेमत, अहमद अल जुबेर या बेसवर इराणने मारा केला आहे. यासोबतच बहरीनच्या शेख ईसा हवाई तळावरही आयआरजीसीने टार्गेट केलंय. या हल्ल्यानंतर कुवेतमध्ये सायरन वाजण्यास सुरुवात झालीयं. या हल्ल्यांमुळे आता पुन्हा एकदा दोन्ही देशांतील युद्ध पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणंचही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. इराकच्या इरबिलमधील एअरबेसवरही इराणकडून जोरदार हल्ला करण्यात आलायं. दोन्ही देशांकडून शस्त्रसंधीतही हल्ले-प्रतिहल्ले सुरुच आहेत. इराणच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धाची घोषणा करण्यात आली असून अमेरिकेकडून इराणवर कठोर हल्ले करणार असल्याची घोषणाच ट्रम्प यांनी केलीयं. ट्रम्प म्हणाले, अनेक महिने झाले आहेत, इराणने समझोता केला पाहिजे इराणने करार केला पाहिजे, अन्यथा कठोर हल्ले करणार असल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
दोन्ही राजेंचा स्वाभिमान दुखावला, सातारकरांनो ताकद दाखवून द्या…जगतापांसाठी जयंत पाटील मैदानात!
या युद्धादरम्यान अमेरिकेने इराणवर आज 49 टॉमहॉक क्षेपणास्त्रे डागली असल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. तर दुसरीकडे इराणकडून होर्मुझची साममुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्यात आलीयं. जहाजे तुमच्या जबाबदारीवर उतरवा, होर्मुझमध्ये आलेलं कोणतंही जहाज उडवू, असा थेट इशाराच इराणच्या जॉइंट मिलिटरी कमिशनची घोषणा केलीयं.
दोन्ही राजेंचा स्वाभिमान दुखावला, सातारकरांनो ताकद दाखवून द्या…जगतापांसाठी जयंत पाटील मैदानात!
दरम्यान, इराण अमेरिका युद्ध आता आखाती देशांपूर्त मर्यादित राहणार नसून आम्ही अमेरिकेच्या जवानांचा मृतदेहाचा खच पडेल, असा थेट इशाराच इराणी संसदेच्या सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अजीजींनी दिला आहे. त्यामुळे आता पुढील काळात दोन्ही देशांतील युद्ध चांगलंच पेटणार असल्याची शक्यता दिसून येत आहे.
