Iran-America War : चर्चेला इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाची मंजुरी, डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ले थांबवले

इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाने चर्चेला मंजुरी दिल्यानंतर अमेरिकेने इराणवरील हल्ले तुर्तास थांबवले असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलीयं.

Untitle

Iran-America War : इराण आणि अमेरिकामध्ये (Iran-America War ) सुरु असलेलं युद्ध थांबल्यानंतर काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा दोन्ही देशांत संघर्ष सुरु असल्याचं चित्र दिसून आलं. दोन्ही देशांकडून एकमेकांवर जोरदार हल्ले केल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हवाई हल्ले केल्यानंतर इराणसोबतची चर्चा सर्वोच्च पातळीवर पोहोचली असून त्यांना मंजुरीही मिळाल्याची माहिती ट्रम्प यांनी दिलीयं. त्यामुळे आता पुन्हा पेटलेलं युद्ध शमण्याची शक्यता आहे.

सोलापुरात पडद्यामागे नेमकं काय शिजतंय? राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तीन आमदार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीला

चर्चेला इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाची मंजुरी मिळाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हवाई हल्ले आणि बॉम्बहल्ले रद्द केल्याची घोषणा केली आहे. कराराच्या प्रमुख मुद्द्यांवर सहमती झाल्याचाही ट्रम्प यांनी दावा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केलेल्या निवेदनात म्हटले की, इराणशी संबंधित चर्चा सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचल्या असून त्यांना मंजुरीही मिळाली आहे. त्यामुळे अमेरिकेकडून नियोजित लष्करी कारवाई स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अमेरिका, इस्रायल, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, तुर्की, पाकिस्तान, बहारीन, कुवेत, जॉर्डन आणि इजिप्त यांच्यासह अनेक देशांनी चर्चेतील संकल्पना आणि अंतिम मुद्द्यांना मान्यता दिल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. इराणविरोधातील हल्ले रद्द करण्यात आले असून मात्र नौदलाची नाकेबंदी कायम ठेवण्यात येणार आहे. प्रस्तावित करार होईपर्यंत ही नाकेबंदी पूर्ण क्षमतेने सुरु राहणार असल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय.

नाशिक विधान परिषदेतून गोकुळ गीतेंनी शेवटच्या क्षणी शस्त्र म्यान का केलं? वाचा पडद्यामागची स्टोरी

सर्वोच्च नेतृत्वाची मंजुरी मिळाल्यानंतर आता करारावर स्वाक्षरी करण्याची वेळ आणि ठिकाण लवकरच जाहीर केलं जाणार असल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं असून कराराचे स्वरुप अटची सहभागी देशांची अधिकृत भूमिका याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. अमेरिकेने तेहराननजीक कराज शहरासह बंदर अब्बास, मिनाब, सिरीक, किश बेट, केशम बेट या भागांवर हवाई हल्ले केले. हा प्रदेश खनिज तेलाचा आहे.

Video : अभिजीत दिपके अन् PM मोदींची अमेरिकेत भेट?; राऊतांचा मोठ्या गौप्यस्फोटाने खळबळ

या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कुवेत आणि बहरिनमधील अमेरिकेच्या लष्करी हवाईतळांसह अमेरिकेच्या पाचव्या नौदल ताफ्याशी संबंधित एकूण १८ ठिकाणी हल्ले केले. यामुळे कुवेतने काही तासांसाठी हवाई हद्द बंद केली होती.

follow us