Download App

Sahara India मध्ये तुमचेही पैसे अडकलेत? रिफंडसाठी पोर्टलवर असा करा अर्ज…

Sahara India Refund Portal : सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदारांचे पैसे परत मिळणार आहेत. सहारा इंडियाचे रिफंड पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज 18 जुलैला हे रिफंड पोर्टल लॉन्च केलं आहे. तर आता हे पैसे कसे मिळवायचे? त्यासाठी अर्ज कसा कारायचा जाणून घेऊ… ( Is your money in Sahara India applay for Refund by Sahara India Refund Portal )

Bhumi Pednekar : अभिनेत्री भूमी पेडणेकर बनली बार्बी डॉल

रिफंडसाठी सहारा इंडिया पोर्टलवर असा करा अर्ज…

सर्वात आधी cooperation.gov.in या वेबसाईटवर जा. तेथे तुम्हाला लॉगिन करावे लागणार आहे.
किंवा तुम्ही https://mocrefund.crcs.gov.in/ या लिंकवर क्लिक करून नोंदणी करा.
यासाठी आधार कार्डशी लिंक बॅंक खाते क्रमांक लागणार आहे.
यानंतर पोर्टलवर संबंधित तपशील भरावा लागणार आहे.
त्यानंतर OTP येईल. तो भरल्यानंतर तुमची नोंदणा होईल.
त्यानंतर ल़ॉग इन टॅबवर क्लिक करा.
त्यानंतर आधारचा तपशील वापरण्याची परवानगी द्यावी लागेल.
त्यानंतर तुमचा सर्व तपशील योग्य असल्यास सबमिट बटणावर क्लिक करा.
त्यानंतर तुमच्या क्लेम रिक्वेस्ट फॉर्म भरा. पावतीचे तपशील आणि कागदपत्रे अपलोड करा.
तर यामध्ये तुमची रक्कम 50 हजारापेक्षा जास्त असल्यास पॅन कार्ड द्यावं लागेल.
तसेच हा अर्ज करण्याची तुम्हाला एकच संधी असणार आहे. त्यामुळे तो काळजीपूर्वक भरा.
अर्ज केल्यावर त्याची प्रिंट काढा. त्यावर फोटो लावा. स्वाक्षरी करा. त्यानंतर तो फॉर्म पोर्टलवर अपलोड करा.
त्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळेल. 30 दिवसांत अर्जाची पडताळणी होईल. 15 दिवसांत दुसरी पडताळणी होईल. मंजुरी मिळाल्यानंतर तुमच्या आधार लिंक बॅंक खात्यावर पैसे जमा केले जातील.

मोदींच्या सेवा सप्ताहानंतर राज्यात साजरा होणारा दादांचा ‘अजितोत्सव’

सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदारांचे पैसे आता 45 दिवसांत त्यांचे अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. अशी माहिती स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. यामध्ये कोट्यावधी लोकांनी पैसे गुंतवले असल्याचं सांगितलं जात आहे. सरकारने 29 मार्चला सहारा समुहाच्या 10 कोटी गुंतवणुकदारांना नऊ महिन्यांच्या आत पैसे परत केले जातील अशी घोषणा केली होती.

ही घोषणा न्यायालयाकडून 5 हजार कोटींच्या सहारा सेबी रिफंड खात्यातून केंद्रीय सहकारी समिती रजिस्ट्रार (सीआरसीएस) ला हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर करण्यात आली होती. या चार समित्यांमध्ये सहारा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, हमारा इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सहारायन यूनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड, स्टार्स मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांचा समावेश आहे.

तर आता रिफंड पोर्टलद्वारे ज्या गुंतवणुकदारांची गुंतवणूक मॅच्युरिटी पूर्ण झाली आहे. त्यांना रक्कम परत केली जाणार आहे. या परताव्यासंबंधी सर्व माहिती या रिफंड पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Tags

follow us