Download App

ISRO Award : भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; ISRO ला अवकाश क्षेत्रातला मानाचा पुरस्कार

ISRO Award : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान (Chandryaan 3) उतरवणारा भारत पहिला देश ठरल्यानंतर जगभरातून कौतूक झालं. त्यानंतर आता इस्त्रोने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अवकाश क्षेत्रातला मानाचा एव्हिएशन वीक पुरस्कार इस्त्रोला मिळाला आहे. चांद्रयान -3 मोहिमेसाठी इस्त्रोला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वीच भारताची चांद्रयान-3 मोहिम पार पडली. या मोहिमेंतर्गत भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवलं होतं. तसेच चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंग आणि रोव्हर चालवणारा भारत जगभरातील चार नंबरचा देश ठरला आहे. दक्षिण ध्रुवाजवळ पोहचणारा भारत देश पहिलाचं असल्याचं पुरस्काराच्या घोषणात म्हटलं आहे. अवघ्या 75 मिलियन डॉलर बजेटमध्ये इस्रोने चंद्रावर लँडिंग केलं. तसंच चंद्रावर पाणी आणि सल्फर असल्याची माहिती देखील या मोहिमेतून मिळाली. ही खरंच मोठी कामगिरी आहे. इस्रोच्यावतीने भारतीय डिप्लोमॅट श्रीप्रिया रंगनाथन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

लोकांच्या संतापानंतर झोमॅटोचा 24 तासांत यु-टर्न : डिलिव्हरी पर्सनच्या सुरक्षेसाठी ‘प्युअर व्हेज’ स्पेशल सेवा मागे

ऑगस्ट महिन्यामध्ये भारताचा विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरलं होतं. चंद्राचा दक्षिण ध्रुव म्हणजे अत्यंत थंड आणि वातावरणाच्या दृष्टीने कठीण प्रदेश आहे. त्यामुळे भारत या भागामध्ये लँडर उतरवणारा पहिला देश ठरला. तर आता अमेरिकेने देखील आपलं यान दक्षिण ध्रुवावर उतरवून अपोलो मिशननंतर तब्बल 50 वर्षांनंतर चंद्रयान अभियान सुरू केलं आहे. या अगोदर 1972 मध्ये अमेरिकेकडून हा प्रयत्न करण्यात आला होता.

Sai Tamhankar: ब्लॅक ड्रेस अन् कर्ली हेअर; सई ताम्हणकरचा लूक चर्चेत, पाहा फोटो

चांद्रयानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडिंग करताच भारताचा तिंरंगा झेंडा फडकावत हा ध्रुव आता आमचाच असल्याचं जगाला दाखवून दिलं आहे. त्यामुळे भारताला जगभरातून सलाम करण्यात येत आहेत. चांद्रयान चंद्रावर लॅंडिंग होताच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत पहिला देश असल्याचं चांद्रयान -3 मोहिमेचे प्रकल्प संचालक पी वीरमुथूवेल यांनी स्पष्ट केलं होतं. चंद्रावर याआधीही रशिया, अमेरिका आणि चीनने पाऊल ठेवलं आहे. या तिन्ही देशांनंतर आता भारतानेही चंद्रावर पाऊल ठेवत तिरंगा फडकावला आहे. तसेच दक्षिण ध्रुवावर ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरलायं.

follow us