Download App

Japan : 33 हजारांहून अधिक घरांची ‘बत्ती’ गुल; भारताकडून आपत्कालीन हेल्पलाईन नंबर्स जारी

Japan Earthquake : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानला मोठा भूकंपाचा (Earthquake) धक्का बसला आहे. पश्चिम जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या तीव्र धक्क्यानंतर जपानमध्ये मोठी त्सुनामी येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर भारतीय दुतावासांकडून सतर्कता बाळगण्यात आली आहे. जपानस्थित भारतीयांसाठी दुतावासांकडून आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून मदतीसाठी हेल्पलाईन नंबरही जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भातील भारतीय दुतावासाकडून एक्सवर पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

दुतावासाकडून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “1 जानेवारी 2024 च्या भूकंप आणि त्सुनामीच्या संदर्भात दूतावासाने आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. कोणत्याही मदतीसाठी या आपत्कालीन क्रमांक आणि ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल.” असं दुतावासाकडून आवाहन करण्यात आलं आहे.

आधी लगीन आमच्या आमदारकीचे… मग तुमच्या महापालिकेचे : कर्डिलेंचे माजी नगरसेवकांना आवाहन

जपान मेटोलॉजिकल एजन्सी (JMA) च्या माहितीसूनर, इशिकावा आणि जवळपासच्या प्रांतांना भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. त्यातील एका भूंकपाची प्राथमिक तीव्रता रिश्टर स्केलवर 7.4 इतकी नोंदवण्यात आली असून या तीव्र भूंकपाच्या धक्क्यांनतर मोठ्या त्सुनामीचा (Tsunami) इशारा देण्यात आला असून, नागरिकांना सुरक्षित स्थळांवर जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Ram Mandir : महाराष्ट्राचं लाकूडं ते गुजरातचे आर्किटेक्ट; सर्व राज्यांचं राम मंदिरासाठी योगदान

7.4 रिश्टर स्केल एवढ्या तीव्र भूकंपाच्या धक्क्यांनंतर जपानमधील प्रशासनाने त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याबरोबर नागरिकांना त्वरीत किनारी भाग सोडण्याचे आवाहन जपान सरकारकडून करण्यात आले आहे.

राज ठाकरेंच्या भेटीमागे CM शिंदेंचा पॉवर गेम; ‘इलेक्शन पॉलिटिक्स’ ‘उबाठा’ला देणार टेन्शन!

5 मीटर उंचीची त्सुनामी येण्याची शक्यता :
जपानमध्ये पाच मीटर उंचीची त्सुनामी येण्याची शक्यता जपान हवामान संस्थेकडून वर्तवण्यात आलीयं. हवामान खात्याने जपान सागरी किनारा तसेच निगाटा, टोयामा, यामागाता, फुकुई आणि ह्योगो प्रांतांसाठी सुनामीचा इशारा दिला आहे.

follow us