Baba Vanga Prediction : समुद्रातील भेगांमुळे त्सुनामी अन् भूकंप; बाबा वेंगाची नवीन भविष्यवाणी काय सांगते?

Baba Vanga Prediction : समुद्रातील भेगांमुळे त्सुनामी अन् भूकंप; बाबा वेंगाची नवीन भविष्यवाणी काय सांगते?

Baba Vanga Prediction : जपान आणि फिलीपिन्सदरम्यान समुद्राखालील भेगांमुळे त्सुनामी आणि भूकंप होणार असल्याची भविष्यवाणी कलाकार रियो तात्सुकी हे न्यू बाबा वेंगा (Baba Vanga Prediction) यांनी केलीयं. न्यू बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीमुळे जपानमधील नागरिक भयभीत झाले असून लोकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीमुळे सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय.

जातीनिहाय जनगणनेची प्रक्रिया सुरू करा, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जुमलेबाजी करू नये

येत्या 5 जुलै 2025 रोजी जपानमध्ये मोठी त्सुनामी येण्याची भविष्यवाणी न्यू बाबा वेंगा यांनी केली आहे. त्यामुळे जपानमध्ये दाखल होणाऱ्या अनेक पर्यटकांनी आपलं ट्रीप रद्द केल्याचं दिसून येत आहे. गार्जियनच्या अहवालानुसार 5 जुलै 2025 रोजी जपानमध्ये विनाशकारी आपत्ती येण्याची भविष्यवाणी करण्यात आलीयं. जपान आणि फिलीपीन्स दरम्यान समुद्राखालील भेगांमुळे त्सुनामी येणार असल्याचं काही लोकांनी मानलंय.

न्यू बाबा वेंगाच्या या भविष्यवाणीमुळे जपानसाठी फ्लाईट बुकींगमध्ये 83 टक्क्यांनी घट झाली असून पूर्व आशियामधील पर्यटकांनी आपत्तीच्या भीतीने आपला प्रवास रद्द केलायं. तर हॉंगकॉंगहुन सरासरी बुकींगमध्ये 50 टक्के घट झाली आहे.

न्यू बाबा वेंगाच्या कोणत्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या…

कोविड-19 महा मारी: न्यू बाबा वेंगाच्या ‘द फ्यूचर आय सॉ’ या पुस्तकात 2020 मध्ये व्हायरसच्या उद्रेकाचा संकेत देण्यात आला होता, जो कोविड-19 महामारीशी जोडला गेला.
1995 कोबे भूकंप: न्यू बाबा वेंगाने या विनाशकारी भूकंपाची भविष्यवाणी केली होती, ज्याने त्यांच्या वास्तविक जगातील घटनांची भविष्यवाणी करण्याच्या क्षमतेचे प्रदर्शन केले.
2011 तोहोकू भूकंप आणि त्सुनामी: त्यांनी या आपत्तीची भविष्यवाणी केली होती, ज्यामध्ये 22,000 हून अधिक मृत्यू झाले, ज्यामुळे त्यांची प्रतिष्ठा आणखी वाढली.
फ्रेडी मर्करी यांचा मृत्यू: त्यांनी क्वीनच्या मृत्यूचीही भविष्यवाणी केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube