Champai Soren : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन (Champai Soren) यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राजभवनात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे दिला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा हेमंत सोरेन (Hemant Soren) झारखंडचे मुख्यमंत्री होणार आहेत.
Jharkhand CM Champai Soren tenders resignation to Governor CP Radhakrishnan at Raj Bhavan in Ranchi. pic.twitter.com/IPFhAESe2k
— ANI (@ANI) July 3, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदासाठी हेमंत सोरेन यांनी दावा केला आहे. राजीनामा सादर केल्यानंतर चंपाई सोरेन म्हणाले की, माझ्याकडे जबाबदारी आली होती मात्र आता हेमंतबाबू आले त्यामुळे आम्ही हेमंत सोरेन यांना पुन्हा नेता म्हणून निवडले आहे.
तर दुसरीकडे हेमंत सोरेन 5 तारखेला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात अशी देखील माहिती समोर आली आहे. झारखंडचे 12 वे मुख्यमंत्री म्हणून चंपाई सोरेन यांनी शपथ घेतली होती.
मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीदरम्यान पक्षाच्या आमदारांनी हेमंत सोरेन यांना जेएमएम विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडण्याचा निर्णय घेतला होता. झारखंडमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणूका होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी हेमंत सोरेन हे झारखंडचे 13वे मुख्यमंत्री बनणार आहे.
पुन्हा भिडणार भारत – पाकिस्तान, लाहोरमध्ये ‘या’ दिवशी होणार सामना, पहा चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक
झारखंड विधानसभेत कोणत्या पक्षाचे किती आमदार
जेएमएमकडे 27 आमदार आहे तर काँग्रेसकडे 17 आणि आरजेडीकडे 1 आमदार आहे. तर भाजपकडे 24 आमदार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काही आमदारांनी राजीनामा दिला दिल्याने सध्या झारखंडमध्ये 81 सदस्यीय विधानसभेत 76 सदस्य आहेत.