Jharkhand Elections 2024 : झारखंड विधानसभा निवडणुकीच यावेळचं (Jharkhand Elections 2024) आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यंदा महिला मतदारांची संख्या जास्त असणाऱ्या मतदारसंघांची संख्या वाढली आहे. मागील निवडणुकीत महिला बहुल मतदारसंघांची संख्या 12 होती ती यंदा 32 झाली आहे. या मतदारसंघांत विजय मिळवणे भाजपसाठी (BJP) आव्हानात्मक असणार आहे. कारण यातील बहुतांश ठिकाणी इंडिया आघाडीचा (INDIA Alliacne) कब्जा आहे.
महिला बहुल मतदारसंघांची संख्या पाहता हेमंत सोरेन सरकारने मुख्यमंत्री मंईयां सन्मान योजना आणली. या योजनेत मिळणारे रक्कम एक हजारांवरून अडीच हजार करण्याची घोषणा इंडिया आघाडीने आपल्या न्यायपत्रात केली आहे. आघाडीच्या या घोषणेला शह देण्यासाठी भाजपने गोगो दीदी योजनेची घोषणा केली आहे. याच पद्धतीच्या योजनेची घोषणा आजसूने देखील आपल्या निवडणूक घोषणापत्रात केली आहे.
भाजपला या मतदारसंघांत कठीण परिस्थिती असल्याचे सांगितले जात आहे. यामागे कारणही आहे. मागील निवडणुकीत महिला बहुल 12 मतदारसंघापैकी खुंटी वगळता सर्व ठिकाणी भाजपचा पराभव झाला होता. यातील पोटका आणि सिमडेगा या दोन मतदारसंघात बऱ्याच काळापासून भाजपचे आमदार होते. पोटकामधून मेनका सरकार सातत्याने विजयी होत होत्या परंतु त्यांचाही पराभव झाला. सिमडेगामध्ये भाजपने उमेदवार बदलला होता. येथे काँग्रेसच्या (Congress Party) भूषण बाडा यांनी भाजपचे श्रद्धानंद बेसरा यांचा अवघ्या 285 मतांच्या फरकाने पराभव केला.
Jharkhand News : अबब! 15 हजार सॅलरी असणाऱ्या नोकराकडे कोट्यवधींचं घबाड; पाहा व्हिडिओ
याच पद्धतीने खरसावा, घाटशिला, चाईबासा, मनोहरपूर तथा मजगाव मध्ये विजयी होण्याचं भाजपच स्वप्न भंगलं होत. या पाचही मतदारसंघांवर झारखंड मुक्ती मोर्चाचा आधीपासूनच कब्जा होता. बोरीयो, बरहेट, लिट्टीपाडा, पाकुड, महेशपूर, शिकारीपाडा, नाला, जामताडा, घाटशिला, पोटका, जुगसलाई, सरायकेला, खरसावा, चाईबासा, मजगांव, जगन्नाथपुर, मनोहरपूर, चक्रधरपूर, तमाड, खिजरी, हटीया, कांके, मांडर, तोरपा, खुंटी, सिसई, गुमला, बिशूनपुर, सिमडेगा, कोलेबिरा, लोहरदगा आणि मनिका या मतदारसंघांत महिला मतदारांची संख्या लक्षणीय आहे.
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, हिमंता बिस्वा सरमा, बाबू लाल मरांडी, अमर कुमार बौरी, लक्ष्मीकांत बाजपेयी, रवींद्र कुमार राय, धर्मेंद्र प्रधान, योगी आदित्यनाथ, मोहन यादव, स्मृती इराणी आणि नायब सिंग सैनी झारखंड निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी भाजपचा प्रचार करताना दिसणार आहे.
झारखंडमध्ये बदललाय घराणेशाहीचा ट्रेंड; मुलगा नाही तर सूना सांभाळताहेत राजकीय वारसा