Download App

झारखंडमध्ये मोठी घडामोड; CM सोरेन यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे छापे

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे खासगी सल्लागार सुनील श्रीवास्तव यांच्या विरोधात आयकर विभागाने कठोर कारवाई केली आहे.

Jharkhand News : झारखंडमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम (Jharkhand Elections) सुरू आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे (Hemant Soren) खासगी सल्लागार सुनील श्रीवास्तव आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या विरोधात आयकर विभागाने कठोर (Income Tax) कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयकर विभागाने सुनील श्रीवास्तव आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच त्यांच्याशी संबंधित १६ ते १७ ठिकाणी छापे टाकले आहेत. राजधानी रांची आणि जमशेदपूर येथील नऊ ठिकाणी छापेमारी सुरू आहे. झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यातच ही कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

झारखंडच्या निवडणुकीत ‘या’ नेत्यांची परीक्षा; पराभव झाला तर राजकारणच धोक्यात..

याआधी १४ ऑक्टोबर रोजी हेमंत सरकारमधील मंत्री मिथिलेश ठाकूर यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीच्या पथकाने छापे टाकले होते. या दरम्यान ईडीने वीस ठिकाणी छापे टाकले होते. जल जीवन मिशनशी संबंधित योजनांच अनियमिततेमुळे ही कारवाई करण्यात आली होती. ईडीच्या पथकाने मिथिलेश ठाकूर यांचे भाऊ विनय ठाकूर आणि खासगी सचिव हरेंद्र सिंह यांच्यासह काही विभागीय अभियंत्यांवर छापे टाकले होते.

मंत्री मिथिलेश ठाकूर आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या घरी छापे टाकण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले होते की ही कारवाई अनपेक्षित नाही. आमच्या विरोधी पक्षांना निवडणुकीच्या वेळीच या गोष्टी दिसायला लागल्या आहेत. ही कारवाई त्यांच्या इशाऱ्यावर झाली आहे. दरम्यान, या कारवाईबाबत आणखी माहिती अजून मिळालेली नाही.

 

follow us