Jio Coin : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी काही दिवसापूर्वी जिओ कॉइन (Jio Coin) लाँच केले आहे. जिओ प्लॅटफॉर्मने नुकतंच पॉलीगॉन लॅब्स (Polygon Labs) एकत्र येत भारतात वेब 3 आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान (Web 3 and Blockchain) आण्याचे काम करत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जिओ कॉईनबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, जिओ कॉइन हा रिलायन्स इंडस्ट्रीजचा (Reliance Industries) एक नवीन प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टच्या मदतीने भारतात ब्लोकचेनचे तंत्रज्ञानाला प्रोत्साहन करण्याचे काम करण्यात येत आहे. ‘कॉइनडीसीएक्स’ च्या अहवालानुसार, हे व्हर्च्युअल कॉइन भारतात क्रिप्टोकरन्सी स्वीकारण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरू शकते.
तर दुसरीकडे आतापर्यंत जिओ कॉइनची किंमत किती असणार याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही. मात्र काही मीडिया रिपोर्ट्सनुसार जिओ कॉईनची किंमत प्रति टोकन 43 रुपये असू शकते. जिओ कॉइन लॉन्च झाल्यानंतर भारतात क्रिप्टोकरन्सीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढेल अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Jio Coin आणि Bitcoin फरक
जिओ कॉइन ही भारताची स्वतःची क्रिप्टोकरन्सी असणार आहे तर बिटकॉइनचा कोणीही मालक नाही. मात्र सातोशी नाकामोतो यांनी बिटकॉइन लॉन्च केले होते असं सांगण्यात येत आहे. जिओ कॉइनची किंमत 43 रुपये असू शकते असा अंदाज आहे तर बिटकॉइन जेव्हा लॉन्च झाले होते तेव्हा त्याची किंमत 0.085 रुपये होती. जिओ कॉईनच्या एकूण बाजार भांडवलाबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
जिओ कॉइन भारतातील क्रिप्टो मार्केटला एक नवीन आयाम देण्यास मदत करेल. बिटकॉइन ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे, ज्याची किंमत $100,300.81 म्हणजेच अंदाजे 83 लाख रुपये आहे. त्याचे एकूण बाजार भांडवल $1,987.52 अब्ज म्हणजेच 8.4 लाख कोटी रुपये आहे.
बिटकॉइनचा पहिला ट्रँड 2009 मध्ये झाला होता. सुरुवातीला, 5,050 बिटकॉइन फक्त $5.20 मध्ये विकले गेले, म्हणजे अंदाजे 433.11 रुपये, म्हणजेच एका बिटकॉइनची किंमत फक्त $0.00099 होती, म्हणजे अंदाजे 0.085 रुपये.
मोफत जिओ कॉइन्स कसे कमवायचे?
तुम्हालाही जिओ कॉइन्स मिळवायचे असेल तर तुम्ही यासाठी जिओस्फीअर (jioSphere) वेब ब्राउझर वापरू शकता. तुम्हाला फक्त तुमच्या अँड्रॉइड, आयओएस, विंडोज, मॅक आणि अँड्रॉइड टीव्ही डिव्हाइसवर हे अॅप डाउनलोड करायचे आहे आणि वापर करायचे आहे.
जिओस्फीअर वेब ब्राउझर डाउनलोड करण्यासाठी स्टेप्स
गुगल किंवा अॅपल अॅप स्टोअर वरून अॅप डाउनलोड करा.
त्यानंतर जिओस्फीअर अॅप उघडा आणि प्रोफाइलमध्ये जा.
प्रोफाइल सेक्शनमधून जिओ कॉइन प्रोग्रामसाठी साइन अप करा.
WE support… मारकडवाडी अन् निवडणूक आयोगा विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
साइन अप केल्यानंतर, तुम्ही जिओ कॉइन्स मिळवू शकता.