Download App

Ram Mandir : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा नसणार, कुठं करणार उत्सव साजरा?

  • Written By: Last Updated:

Ram Mandir : उद्या अयोध्येतील भव्य राम मंदिरा (Ram Mandir) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्या नगरी (Ayodhya) सजली आहे. या सोहळ्याला देशभरातील अनेक व्हीआयपी, राजकारणी यांना निमंत्रित करण्यात आलं. निमंत्रित केले गेलेले मान्यवरही या सोहळ्याला हजर राहणार आहेत. हा सोहळा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे भाजपचे (BJP) अनेक राष्ट्रीय स्तरावरील नेते या सोहळ्याला हजर राहणार आहेत. मात्र, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे या सोहळ्यात  सहभागी होणार नाहीत. खुद्द जेपी नड्ड (JP Nadda) यांनी X वर पोस्ट लिहित याबाबतची माहिती दिली आहे.

आता कोणीही ‘सिंगल’ राहणार नाही! जगात AI गर्लफ्रेंडची एन्ट्री; खास पद्धतीने दूर करते ‘पुरुषांचा एकटेपणा’ 

अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन उद्या म्हणजेच 22 जानेवारीला होणार आहे. त्यासाठी जय्यद तयारी सुरू आहे. या सोहळ्याचे जेपी नड्डा यांना निमंत्रिण पाठवलं. हे निमंत्रण मिळताच जेपी नड्डा यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबद्दल आमंत्रित केल्याबद्दल श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे आभार मानले. त्यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये नड्डा यांनी लिहिलं की, आपल्याला अयोध्येतील श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आहे. याबाबब मी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे आभार मानतो. 500 वर्षांच्या संघर्षानंतर राम मंदिराचे भव्य निर्माण होताना पाहण्याचं भाग्य आपल्याला मिळालं आहे. मी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर लवकरच सहकुटुंब दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहे. 22 जानेवारी रोजी दिल्लीतील झंडेलवालन मंदिरातील प्रांगणातून प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा साक्षी बनणार आहे, असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

माझ्या वडिलांची अदृश्य शक्तींकडून बदनामी सुरू, राजकारण करा पण…; सुप्रिया सुळेंचं भाजपवर टीकास्त्र 

दरम्यान, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. अयोध्येत मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. संभाव्य गर्दी टाळण्यासाठी 22 जानेवारीला रामभक्तांनी अयोध्येत येऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच केले होतं. तसंच प्राणप्रतिष्ठा सोहळा ऑनलाइन दाखवला जाणार आहे. या सोहळ्याचे प्रसारण सर्वत्र मोठ्या पडद्यावर दाखवले जाणार आहे.

विरोधकांची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे पाठ
दरम्यान, इंडिया आघाडीच्या अनेक प्रमुख नेत्यांनी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, अधीर रंजन चौधरी यांनी उद्घाटनाला उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले आहे. हा भाजपचा राजकीय कार्यक्रम असल्याने ते जाणार नसल्याचे या नेत्यांनी सांगितले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, रलालू प्रसाद यादव, शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांनीही यांनीही उद्घाटनाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती दिली आहे.

follow us