Jyoti Malhotra : पाकिस्तानशी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली युट्युबर ज्योती मल्होत्राच्या (Jyoti Malhotra) केसमध्ये अनेक नवनवीन धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत. सध्या ज्योती मल्होत्रा अटकेत असून पोलिसांकडून तिची कसून चौकशी केली जात आहे. तिच्या मोबाईलमधील सिक्रेट आता पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामध्ये जट्ट रंधावा आणि बिल्लो तेरी आंख कतल हे कोड पोलिसांच्या तपासात उघड झाल्याची धक्कदायक माहिती समोर आलीयं. त्यामुळे आता ज्योती मल्होत्राची संपूर्ण कुंडलीच बाहेर असल्याची शक्यता वर्तवण्यता येत आहे.
ज्योती मल्होत्राने पाकिस्तानी हॅंडलर्सचे मोबाईल नंबर आपल्या फोनमध्ये अनेक वेगवेगळ्या नावाने जतन केलेले होते. त्यापैकीच एक म्हणजे जट्ट रंधावा या नावाने तिने एक नंबर जतन केलेला होता. ज्योतीची ही हरकत केवळ सावधगिरीच नव्हती तर तिच्या नियोजित हेरगिरीच्या नेटवर्कचा हा एक भाग होता. ज्योती मल्होत्रा ही तिच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅटच्या एन्क्रिप्टेड अॅप्सवरुन गुप्त माहिती पाकिस्तान्यांना शेअर करीत असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय.
नगर शहरातील मेडिकल कॉलेज शिर्डीला नेण्याचा डाव…लंकेंचा अप्रत्यक्ष विखेंना टोला
जम्मू काश्मिरातील बालीमध्ये ज्योती मल्होत्राने एक फोटो काढला होता. हा फोटो तिने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केलेला होता. यामध्ये कॅप्शनमध्ये ‘रंधावा जी म्हणाल…बिल्लो तेरी आंख कतल’ असं तिने कॅप्शन लिहिलं होतं. तिचा हाच फोटो पाकिस्तानी हॅंडलरशी संपर्क असल्याचा संशय पोलिसांकडून बळावण्यात आला आहे. जम्मू काश्मीरातून ज्योती 6 मे रोजी परतली होती. त्यानंतर काही दिवसांतच तिच्यावर कारवाई झाली.
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांना हरियाणामधून अटक करण्यात आली आहे. यामध्ये ज्योती मल्होत्रा या युट्यूबरचा समावेश आहे. तिला हिसारच्या सिव्हिल लाईन्स पोलिसांनी अटक केली असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.ज्योती मल्होत्रा हिला पोलिसांनी अटक केल्यानंतर पोलिस तपासात तिची मैत्रीण प्रियंका सेनापती हिचं नाव समोर आलंय.
पोलिसांनी तिच्या ओडिसामधील घरी छापेमारी केली आहे. ओडिसा मधील पुरी येथे राहणारी प्रियंका सेनापती ही देखील एक युट्युबर आहे. ज्योती मल्होत्राशी असलेल्या तिच्या मैत्रीमुळे पोलिसांकडून त्याची चौकशी केली जात आहे. प्रियांका आणि ज्योती यांच्यातील मैत्री जगजाहीर आहे. सोशल मीडियावर सध्या त्यांचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.