Download App

Karnataka Election : काँग्रेस नेत्याचा दावा! ‘या’ एकाच घोषणेनं केला भाजपाचा पराभव निश्चित

Karnataka Election Results 2023 : कर्नाटक निवडणुकीत मतमोजणीला (Karnataka Election Result 2023) आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काँग्रेसला (Congress) मोठी आघाडी मिळाली आहे. तर भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. भाजप सरकारमधील अनेक मंत्री पिछाडीवर पडले आहेत. भाजपचे अनेक मोठे नेते मागे पडले असून भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

भाजप सध्या पराभवाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पण, हा पराभव का झाला याचे कारण काँग्रेस नेत्याने स्पष्ट केले आहे. राजस्थान काँग्रेसचे (Rajasthan Congress) दिग्गज नेते माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) म्हणाले, की काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळत आहे. मोठ्या संख्येने आम्ही कर्नाटकात विजयी होऊ. 40 टक्के दलाली घेणारं भाजप सरकारविरोधात आम्ही दिलेल्या घोषणेला जनतेनं स्विकारलं. तो भाजपाच्या पराभवातील मोठा मुद्दा राहिला. लोकांनी तो मुद्दा स्विकारला आणि काँग्रेसला बहुमत दिलं.

यंदा विधानसभेत त्रिशंकू परिस्थिती राहिल असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे भाजपने दुसऱ्या प्लॅनवर काम करण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते जेडीएस नेत्यांशी संपर्क करत असल्याची माहिती आहे.

दुसरीकडे काँग्रेसही सतर्क असून कोणताही दगाफटका होऊ नये याची काळजी घेत आहे. काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना बंगळुरूला बोलावून घेतले आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी या आमदारांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार असल्याचेही समजते. यानंतर राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. अजून पूर्ण निकाल हाती आलेले नाहीत. त्यामुळे चित्र अजून स्पष्ट नाही. मात्र सध्याच्या स्थितीवरून तरी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरत असल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us