Download App

Karnataka Election Results : सिद्धरामय्यांच्या जादू पुढं जेडीएसच्या उमेदवाराच डिपॉझिट जप्त

Karnataka Election Results 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून सिद्धरामय्या यांच्याकडे पाहिले जाते. मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये देखील सिद्धरामय्या भावी मुख्यमंत्री म्हणून आघाडीवर होते. त्यामुळे कर्नाटकमधील वरुणा मतदारसंघाकडे (Varuna constituency) देशभरातील लोकांचे लक्ष लागले होते. वरुणाच्या जागेवरून सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा 46 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.

वरुणा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या सिद्धरामय्या यांना एकूण 119430 मते मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार व्ही सोमण्णा 734224 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जेडीएसच्या उमेदवाराला केवळ 1034 मते मिळाली. वरुणा विधानसभा जागा चामराजनगर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसने जिंकलेल्या 78 विधानसभा जागांपैकी वरुणा ही एक जागा आहे.

कर्नाटकच्या ‘या’ उमेदवाराची होतेय अजित पवारांशी तुलना, जाणून घ्या प्रकरण

सिद्धरामय्या यांचा म्हैसूर भागातील लिंगायत मतदारांवर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे भाजपने देखील लिंगायत मठांवर प्रभाव असलेले केव्ही सोमण्णा यांना उमेदवारी दिली होती. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे मूळचे म्हैसूर जिल्ह्यातील सिद्धरामनहुंडीचे असून 2013 ते 2018 पर्यंत ते मुख्यमंत्री होते. कर्नाटकमध्ये काँग्रेसला 113 जागांचे बहुमत मिळाल्यास सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री होऊ शकतात. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत सिद्धरामय्या मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांच्याकडे काँग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी होती. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा मोठा पराभव झाला होता. काँग्रेस पक्ष 122 जागांवरून 80 जागांवर घसरला होता.

Karnataka Election Results : बसवराज बोम्मईंचा विजयाचा ‘चौकार’, पण भाजपची नौका बुडाली

सिद्धरामय्या हे पूर्वी जेडीएसचे मोठे नेते मानले जात होते. त्यांनी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्यासोबत काम केले होते. पण जेव्हा देवेगौडांनी आपला मुलगा कुमारस्वामी यांना उत्तराधिकारी म्हणून निवडले त्यावेळी संतप्त झालेल्या सिद्धरामय्या यांनी पक्ष सोडला. 2005 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Tags

follow us