कर्नाटकच्या ‘या’ उमेदवाराची होतेय अजित पवारांशी तुलना, जाणून घ्या प्रकरण
Ajit Pawar Vs D K SHIVAKUMAR : आज कर्नाटक निवडणुकीचे निकाल (Karnataka Election Result) जाहीर झाले आहे. यामध्ये भाजपला धोबीपछाड देत काँग्रेसने विजयाचा झेंडा रोवला आहे. यातच या निवडणुकीत एका उमेदवाराने विजयाचे देखील रेकॉर्ड केले आहे. या निवडणुकीत काँग्रेसेचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार तब्बल आठव्यांदा निवडून आले. विशेष म्हणजे निवडणुकीत ते आपल्या मतदारसंघात फक्त शेवटच्या दिवशी प्रचार करतात. त्यांच्या या स्टाईलची तुलना आता महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी होऊ लागली आहे.
काँग्रेसेचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार तब्बल आठव्यांदा निवडून आले. आहे तर महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे एका आकड्याने मागे असून अजित दादा हे बारामती विधानसभेतून सातवेळा निवडून आले आहेत. निवडणुकीदरम्यान पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर उमेदवारांचा महाराष्ट्रभर प्रचार करतात. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात ते आपल्या बारामती (Baramati) मतदारसंघात प्रचार करतात.
असे असले तरीही अजित पवारांचा दबदबा पाहता व लोकप्रियता पाहता निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्यांनी विजयी होत आले आहेत. 2019 च्या निवडणुकीत तर दादांनी कमालच केली. अजित पवार यांनी 1 लाख 65 हजार मतांनी विजय मिळवून विरोधकांची अनामत जप्त केली होती. त्यामुळेच बारामती आणि अजित पवार हे समिकरण तयार झाले आहे.
लहान मुलांच्या विकासासाठी त्यांच्या आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा
कर्नाटक निवडणुकीत (Karnataka) काँग्रेसने बहुमत प्राप्त केले आहे. विधानसभेच्या 224 पैकी 136 जागांवर काँग्रेसने बाजी मारली आहे. त्यामुळे काँग्रेसची सत्ता स्थापन होणार, यात काही शंका नाही. दरम्यान, काँग्रेसच्या या विजयात प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांचा सिंहाचा वाटा असल्याचे बोलले जात आहे. डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे.