Karnataka Election Results : बसवराज बोम्मईंचा विजयाचा ‘चौकार’, पण भाजपची नौका बुडाली

Karnataka Election Results : बसवराज बोम्मईंचा विजयाचा ‘चौकार’, पण भाजपची नौका बुडाली

Karnataka Election Results 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आता कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापन करणार हे निश्चित झाले आहे. दुसरीकडे सत्ताधारी भाजपची दाणादाण उडाली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांना त्यांची जागा राखण्यात यश आले, पण पक्षाची नौका किनाऱ्याला लावू शकले नाहीत. पक्षाचा पराभव मान्य असल्याचे बसवराज बोम्मई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

शिगगांव मतदारसंघातून (Shigaon Constituency) बसवराज बोम्मई यांनी काँग्रेसचे उमेदवार यासिर अहमद खान पठाण यांचा 35978 मतांनी पराभव केला. पीजेडी(एस) शशिधर येलिगर यांनी तिसरा क्रमांक पटकावला. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत बसवराज बोम्मई यांनी शिगगाव जागा जिंकली होती. त्यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या सय्यद अझीपीर खादरी यांचा 9,503 मतांच्या फरकाने पराभव केला होता.

शिगगाव मतदारसंघावर संपूर्ण कर्नाटकचे लक्ष लागून राहिले होते. कारण या मतदार संघाचे नेतृत्व विद्यामान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे करत होते. बोम्मई यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएस यांनी देखील ही लढत प्रतिष्ठेची केली होती. शिगगाव मतदारसंघ हा मुख्यमंत्री बसवराज बोम्मईआणि लिंगायत समाजाचा बालेकिल्ला मानला जातो. लिंगायत समाज हा भाजपचा एकनिष्ठ मानला जातो. मात्र यावेळी ही जागा काबीज करण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसच्या उमेदवारांनी मोठी मेहनत केल्याचे दिसून आले.

Karnataka Election Results : भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या लक्ष्मण सवदींचा दणदणीत विजय

बोम्मई यांच्या विरोधात काँग्रेसने यासिर अहमद खान पठाण यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे जेडीएसने शशिधर चन्नाबसप्पा यलीगर यांना तिकीट दिले होते. या मतदार संघात काँग्रेसला फार यश मिळालेले नाही. बोम्मई इथून तीन वेळा विजयी झाले आहेत. 1994 मध्ये काँग्रेसने येथे शेवटचा विजय मिळवला होता.

बसवराज बोम्मई यांची राजकीय कारकीर्द
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादवर वादग्रस्त विधान केल्याने खऱ्या अर्थाने ते चर्चेत आले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा सीमाप्रश्न पेटला होता. तसेच कर्नाटकमधील शाळा-कॉलेजमध्ये हिजाब वापरण्याच्या मुद्दावरुन देखील मोठं राजकारण झालं होतं. सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेले बसवराज बोम्मई हे मुळचे भाजपचे नेते नाहीत.

Karnataka Election Result: एचडी कुमारस्वामी जिंकले, पण एक स्वप्न भंगले

केंद्रीय नेतृत्वाने भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडीयुराप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावल्यानंतर लिंगायत समाजाचे नेते बसवराज बोम्मई कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले होते. येडीयुराप्पा यांच्या मंत्रीमंडळात देखील बोम्मई यांना दुसरे स्थान होते. बोम्मई हे मुळ भाजपचे नेते नाहीत. 13 वर्षापूर्वी त्यांनी जेडीएसमधून भाजपात प्रवेश केला होता. बोम्मई यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातल्या शिगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

बसवराज बोम्मई यांचे वडील एसआर बोम्मई हे देखील कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. बसवराज बोम्मई यांची राजकीय कारकीर्द जनता दलातून सुरु झाली होती. बोम्मई हे लिंगायत समाजाचे कर्नाटकमधील मोठे नेते आहेत. त्यांनी 2008 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर ते येडीयुराप्पांचे खास बनले. ते दोन वेळा विधान परिषदेवर आणि तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube