Congress Leader Heart Attack : कर्नाटकची राजधानी बंगळुरूत एक (Karnataka News) हैराण करणारी बातमी समोर आली आहे. येथे एका पत्रकार परिषदेत बोलत असतानाच काँग्रेस नेत्याचा (Congress Party) मृत्यू झाला. रविचंद्रन असे या नेत्याचे नाव असून ते लाल मॉर्निंग वॉकर्स असोसिएशनचे अध्यक्ष होते. कर्नाटकात सध्या मुडा जमीन घोटाळा (MUDA Scam) चांगलाच गाजत आहे. या घोटाळ्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या अडचणीत आले आहेत. मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
कुरुबारा संघाचे अध्यक्ष आणि कोलार जिल्ह्यातील रहिवासी रविचंद्रन यांना अचानक हॉर्ट अटॅक आला आणि ते जागेवरच कोसळून बेशुद्ध झाले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यानंतर त्यांना तत्काळ कनिंघम रोड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथे आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
‘मुडा’ घोटाळ्यात CM सिद्धरामय्यांना दणका; खटला चालवण्यास राज्यपालांचा ग्रीन सिग्नल
या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी (Siddaramaiah) शोक व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीली. कर्नाटक राज्य मागासवर्ग आणि अल्पसंख्यक असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमच्या पक्षाचे कार्यकर्ते रविचंद्रन (CK Ravichandran) यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांचा मृत्यू अतिशय दुःखद आहे.
CK Ravichandran, @INCKarnataka, Karnataka Backward Classes & Minorities Assn member died of cardiac arrest while addressing press conference at Press Club #Bengaluru opposing #Karnataka Guv @TCGEHLOT’s permission to prosecute CM @siddaramaiah. @TOIBengaluru #Health pic.twitter.com/zkCjdi5uma
— Niranjan Kaggere (@nkaggere) August 19, 2024
म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण अर्थात ‘मुडा’ कर्नाटकची राज्यस्तरीय विकास संस्था आहे. या संस्थेचं काम शहरी विकासाला प्रोत्साहन देणं आणि गुणवत्तापूर्ण मुलभूत सुविधा निर्माण करणं आहे. लोकांनी कमी दरात घरे उपलब्ध करून देण्याचं कामही संस्था करते. आपली जमीन गमावणाऱ्या लोकांसाठी मुडाने एक योजना सुरू केली होती. 50:50 नावाच्या या योजनेत जमीन गमावणारे लोक 50 टक्के हिस्सेदार होते. ही योजना सन 2009 मध्ये पहिल्यांदा लागू करण्यात आली होती. नंतर 2020 मध्ये भाजप सरकारने ही योजना बंद केली होती. योजना बंद झाल्यानंतरही मुडाने जमिनीचे अधिग्रहण आणि आवंटनाचे काम सुरुच ठेवले असा आरोप आहे.
यामुळेच सगळा वाद उभा राहिला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नीला या योजनेत फायदा मिळाला. त्यांच्या मालकीची 3 एकर 16 गुंठे जमीन मुडाने अधिग्रहीत केली. या बदल्यात एका महागड्या परिसरातील 14 साइट आवंटित करण्यात आल्या. म्हैसूर शहराच्या बाहेरील परिसरात असणाऱ्या केसारेमध्ये ही जमीन मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या पत्नीच्या भावाने त्यांनी उपहार स्वरुपात दिली होती.
स्टेट बँक अन् PNB मधील अकाउंट बंद करा; कर्नाटक सरकारच्या आदेशाने खळबळ!