स्टेट बँक अन् PNB मधील अकाउंट बंद करा; कर्नाटक सरकारच्या आदेशाने खळबळ!
Karnataka Government : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने राज्यातील (Karnataka Government) सर्व सरकारी विभागांना एक अजब आदेश दिला आहे. या सरकारी आदेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सरकारी विभागांनी भारतीय स्टेट बँक (SBI) आणि पंजाब नॅशनल बँकेतील (PNB) सर्व खाती बंद करावीत असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करा अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. या बँकांतील खात्यात जितके पैसे आहेत ते तत्काळ काढून घ्यावे लागणार आहेत. या दोन्ही बँकांतील सरकारी खात्यांत आता कोणताच व्यवहार होणार नाही. या बँकेत जमा असलेल्या पैशांचा गैरवापर होत असल्याचा आरोप झाल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून (Siddaramaiah) मंजुरी मिळाल्यानंतर राज्याच्या वित्त सचिवांनी सर्व सरकारी विभागांसाठी हे आदेश जारी केले आहेत. या आदेशात म्हटले आहे की भारतीय स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँकेत राज्य सरकारी विभाग, पब्लिक एंटरप्राजेस, कॉर्पोरेशन्स, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे यांसह अन्य सरकारी संस्थांचे खाते आहेत त्यांना तत्काळ बंद करावे. यानंतर या दोन्ही बँकांत कोणताच व्यवहार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Karnataka : कर्नाटकात राडा! ‘इंग्रजी’ फलकांची तोडफोड; ’60 टक्के कन्नड’च्या आदेशाचा वाद पेटला
राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की स्टेट पब्लिक अकाउंट्स कमिटीने या बँकांबरोबर व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आम्ही आदेश दिले आहेत. या बँकांनी आता अर्थ विभागाशी संपर्क साधला असून लवकरच या प्रकरणात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस सरकार आणि विरोधी पक्ष भाजपात या मु्द्द्यावर बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू आहे.
कर्नाटक सरकारने 2013 साली एसबीआयमध्ये दहा कोटी रुपये मुदत ठेव केले होते. राज्य सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही रक्कम ठेवली होती. पण नंतर ही रक्कम बनावट कागदपत्रांच्या मदतीने एका खासगी कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी वापरण्यात आल्याचा दावा केला जात आहे. कर्नाटक औद्योगिक विकास महामंडळाने पंजाब नॅशनल बँकेत 2011 मध्ये 25 कोटींची रक्कम एफडी म्हणून ठेवली होती. यातील फक्त 13 कोटींचीच रक्कम परत मिळाली. बाकीची रक्कम मिळू शकलेली नाही.
Karnataka : CM सिद्धरामय्यांची खुर्ची धोक्यात? ‘त्या’ गुप्त बैठकीनंतर DK थेट दिल्लीला रवाना