Download App

हृदयद्रावक घटना! टॅक्टर ट्रॉली तलावात पलटी झाल्यानं २२ जणांचा मृत्यू, भीषण अपघाताने उत्तरप्रदेश हादरलं

  • Written By: Last Updated:

Kasganj Accident UP: उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. कासगंज जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. माघी पौर्णिमेनिमित्त गंगेत स्नान करण्यासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पलटी होऊन भीषण दुर्घटना घडली. या भीषण अपघातात एकूण 22 मृत्यू झाला. हा हृदयद्रावक अपघात शनिवारी सकाळी घडला.

आव्हाड, तुतारी वाजवा अन् एक लाख रुपये घ्या; पण चेक लिहिताना मिटकरींकडून गफलत 

ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट तलावात जाऊन उलटले. त्यामुळं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघाताच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, माघ पौर्णिमेनिमित्त देवाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांनी भरलेला ट्रॅक्टर तलावात पटली झाला. या अपघातात 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये काही महिला आणि मुलांचा समावेश आहे. अलीगड रेंजचे आयजी शलभ माथूर यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. समोरून येणाऱ्या कारसोबतचा अपघात टाळण्याचा प्रयत्न करत असताना ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरची ट्रॉली तलावात पलटी झाली, असे त्यांनी सांगितले.

नड्डांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कमळावर लढण्याचा प्रस्ताव दिला; संजय राऊतांनी डिवचलं 

ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ५४ जण होते
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये कासा, खिरीया, रौरी, बरार या गावातील 54 जण प्रवास करत होते. या ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये राउरी येथील चार जण होते, तर खिरिया येथील दोन जण होते. कासा गावातील शिवम, उस्मा देवी, आर्यन, अंजली, अनुभव, रजनी, राणी, कुंवरपाल, दीक्षा, मॉडेल, प्रांशु, गायत्री देवी, सतेंद्र सिंग, पुष्पा देवी, गौरव, गौरवचा मुलगा बिट्टू, मुलगी सपना, शकुंतला देवी, मीरा देवी, दीक्षा अवनेश, दर्शनपाल, लक्ष्मी देवी, रुबी, अनमोल, देवांशू, महेंद्रपाल, शिवानी, कार्तिक, सोम्या, ओमपाल, मिथलेश, तनु, राजकुमारी, कुलदीप, कमलेश, संजीव, जाविता, संजीवची मुलगी पायल, रामबेती, राजपाल, मीरा असे लोक होते.

दरम्यान, या भीषण अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. काही भाविकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू असून प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने घेतली आहे.

योगी आदित्यनाथ यांच्याकडून शोक व्यक्त

या भीषण अपघातानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी कासगंज जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना अपघातातील जखमींना तातडीने आणि आवश्यक उपचार देण्याचे निर्देश दिले.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारने मदत जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या दुर्घटनेतील बचावकार्य अद्यापही सुरू असून तलावाच्या दलदलीत कोणी भाविक अडकला आहे का, याचा तपास सुरू आहे.

follow us