आव्हाड, तुतारी वाजवा अन् एक लाख रुपये घ्या; पण चेक लिहिताना मिटकरींकडून गफलत

आव्हाड, तुतारी वाजवा अन् एक लाख रुपये घ्या; पण चेक लिहिताना मिटकरींकडून गफलत

Amol Mitkari : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission)राष्ट्रवादी शरद पवार गटाला (Nationalist Sharad Pawar group) तुतारी हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाचं अनावरण सोहळा रागगडावर पार पडला. या सोहळ्यासाठी शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule), आमदार जितेंद्र आव्हाड(jitendra awhad), आमदार राजेश टोपे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी वाजवली. मात्र याच तुतारी वाजवण्यावरुन मोठं राजकारण घडतंय. जितेंद्र आव्हाड यांना तुतारी वाजवण्यावरुन अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आव्हान दिलं आहे. आव्हाडांनी तुतारी वाजवल्यास एक लाख रुपये देणार असल्याचे मिटकरी यांनी जाहीर केला. हा चेक समोर आला आहे. या चेकमध्ये मोठी चूक झाल्याचे दिसून येत आहे.

विमानतळावर सेल्फी घ्यायला आलेल्या चाहत्याला नसीरुद्दीन शाहने ढकललं, व्हिडिओ होतोय व्हायरल

अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी लिहिलेल्या चेकमध्ये ज्या ठिकाणी नाव लिहायचे त्या ठिकाणी रक्कम लिहिली आहे. आणि ज्या ठिकाणी रक्कम लिहायची त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांचे नाव लिहिले आहे. हा चेक लिहिताना अमोल मिटकरी यांनी मोठी चूक केली आहे.

अजय देवगणने सांगितला ‘शैतान’चा अविस्मरणीय किस्सा; म्हणाला, ’10-12 वर्षात…’

जितेंद्र आव्हाड यांनी रायगडावर तुतारी वाजवल्याचा व्हिडीओ ट्वीट करत अमोल मिटकरी यांनी ही तुतारी आहे की पुंगी? आमच्याकडे उन्हाळ्यात कुल्फी विकणारे असंच वाजवतात, असं म्हटलं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या ट्वीटमध्ये जितेंद्र आव्हाड हे एकटेच तुतारी वाजवताना दिसत आहेत.

दुसरे कोणतेही नेते त्या ठिकाणी उपस्थित दिसत नाहीत, त्यावर त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत म्हटलंय की, रायगडावर एकटेच पोहोचलेत. बाकीचे कालवा बैठकीत दादांकडे पुण्यात रेंगाळलेत. आपण दिलेलं चॅलेंज या महोदयांनी स्वीकारलं. मात्र कार्यक्रमानंतर एकट्याने वाजवावी आणि एकट्यानेच आवाज तुतारीतून काढावा हे चॅलेंज होतं. हे एकटे आले पण बाकी कुठे आहेत? सावधान. असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अमोल मिटकरी आव्हाडांच्या तुतारी वाजवतानाच्या व्हिडीओबद्दल म्हणाले की, 26 फेब्रुवारीपासून मुंबईत विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी आणावी आणि पत्रकारांसमोर ती एकट्याने वाजवून दाखवावी. त्यांनी हे आव्हान पूर्ण केलं तर त्यांना आम्ही 1 लाख रुपये देऊ. त्यांच्या नावाने चेक आपल्याकडे तयार आहे, असं म्हणत त्यांनी चेक सर्व पत्रकारांना दाखवला. पण त्या चेकमध्ये अशी मोठी गफलत झाल्याचं पाहायला मिळत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube