Kolkata Violence: पश्चिम बंगालमधील आरजी कर मेडिकल कॉलेज (RG Kar Medical College) आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर लैगिंक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. घटनेविरोधात देशभरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. अशातच मध्यरात्री आंदोलकांवर हल्ला करण्यात आला. तसेच रुग्णालयाचीही तोडफोड करण्यात आली आहे. यावरून मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी गंभीर आरोप केला.
अजितदादा कर्जत-जामखेडमधून लढणार; आणखी एक पर्याय शोधला; रोहित पवारांचा खळबळजनक दावा
भाजप आणि डावे पक्ष मिळून हल्ले करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केला.
#WATCH | Kolkata: West Bengal CM Mamata Banerjee says, “As far as the information I have, I will not blame the students… The incident is very unfortunate, we still say that they should be hung… We have given all the documents, till the time our police were investigating,… pic.twitter.com/w62x3r4WqG
— ANI (@ANI) August 15, 2024
ममता बॅनर्जीं म्हणाल्या, आरजी कर रुग्णालयामध्ये झालेल्या तोडफोडीसाठी विद्यार्थ्यांना जबाबदार धरणार नाही. मात्र काही राजकीय पक्ष मुद्दाम वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते पश्चिम बंगालमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. वाम आणि राम हे एकत्रित येऊन हे सर्व एकत्र करत आहेत, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
निवडणूक लढवली नाही, पण नशिबाने मुख्यमंत्री…; अजितदादांचा उद्धव ठाकरेंना मार्मिक टोला
पुढं त्या म्हणाल्या, हे विद्यार्थ्यांचे नाही तर समाजकंटकांचे कृत्य आहे. काल आरजी करमध्ये जे काही तांडव करण्यात आला होतं. त्यात आरजी करच्या विद्यार्थ्यांचा सहभाग नव्हता. जे व्हिडिओ समोर आले आहेत, त्यात काहींच्या हातात राष्ट्रध्वज आहे. ते भाजपचे लोक आहेत. तर काहींच्या हातात पांढरे लाल झेंडे आहेत. कालही पोलिसांवर हल्ला झाला. मात्र, पोलिसांनी संयम राखला, मी या घटनेचा निषेध करते. तसेच आरोपीला फाशी व्हावी यासाठी मी उद्या मोर्चा काढणार आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
हत्येची आणि अत्याचाराची ही घटना वेदनादायी आणि अस्वस्थ करणारी आहे. या घटनेची सीबीआयला संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तपास चालू आहे. कधी कधी अशा घटना घडतात. उन्नावमध्येही असाच प्रकार घडला होता. पोलीस तपास करत असल्याची माहिती ममता बॅनर्जींनी दिली.