निवडणूक लढवली नाही, पण नशिबाने मुख्यमंत्री…; अजितदादांचा उद्धव ठाकरेंना मार्मिक टोला
Ajit Pawar on Uddhav Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली. निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव आघाडीवर आहे. दरम्यान, आज एका मुलाखतीत बोलतांना त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत परखड मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टोलाही लगावला.
सुनेत्रा पवारांना उभं करायचा निर्णय पार्लमेंट्री बोर्डाचा; अजित पवारांचा मोठा खुलासा
अजित पवार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत अजित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. राज्यात मुख्यमंत्रीपदाची संधी कनिष्ठ असलेले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना यांना मिळाली. परंतु आपणास मिळाली नाही, असं विधान अजितदादांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्याविषयी विचारले असता ते म्हणाले, तो पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम राजकीय कार्यक्रम नव्हता…. मी 1991 मध्ये राजकारणात आलो. देवेंद्र फडणवीस यांनी 1999 मध्ये आणि एकनाथ शिंदे हे 2004 मध्ये राजकारणात आले, हे मी हसत हसत म्हणालो. तसेच, निवडणूक न लढवलेले उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री झाले. कारण त्यांच्याकडे बहुमताचा आकडा होता.
संजय राऊत प्रगल्भ नेते नाहीत, तोल गेल्याने ते काहीही बरळतात; वंचितचा हल्लाबोल
अजितदादा म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. उद्धव ठाकरे हे निवडणूक न लढवता मुख्यमंत्री झाले. ते आधी मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आमदार झाले. कारण त्यांच्याकडे बहुमताचा आकडा होता. तसेच तो नशीबाचाही भाग असतो, असा टोला अजितदादांनी लगावला. पृथ्वीराज चव्हाण हे खासदार होते. केंद्रात मंत्री होते. तरीही ते मुख्यमंत्री बनले. त्यानंतर ते आमदार बनल्याचं अजितदादा म्हणाले.
मी घेतलेला निर्णय कुटुंबासाठी चुकीचा
ते म्हणाले, सुनेत्रा पवारांनी उभं करणं ही चुक होती, हे म्हणालो. माझ्या मनात जे येतं, ते मी बोलतो. मी 35 वर्षांपासून राजकारणात आहे. माझ्या निर्णयाचा मी निवडणुकीनंतर खूप विचार केला. हे कसं घडले? का घडलं? त्याला मीच जबाबदार आहे. मी कोणाला दोष देत नाही. मी हे करायला नको होते, बारामतीत मी घेतलेला निर्णय कुटुंबासाठी चुकीचा होता. , असे अजित पवार म्हणाले.
मी महायुतीचा प्रचार करतोय….
शरद पवारांसोबत पुन्हा जाणार का? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी ‘नो कमेंट’ असं उत्तर दिलं. ते म्हणाले, नो कॉमेंट्स… मी आता महायुतीचा प्रचार करत आहे, असं अजित पवार म्हणाले.
आम्हाला बहुमत मिळेल
मी बजेटमध्ये चांगल्या योजना आणल्या आहेत. त्याबाबत आम्ही लोकांना सांगत आहोत. आम्ही विकास करत आहोत. आम्ही आतापर्यंत काय काय काम केलं, कोणत्या मतदारसंघात काय केलं, याची माहिती लोकांना देत आहोत. आम्हाला बहुमत मिळेल हा आमचा प्रयत्न असल्याचं अजितदादा म्हणाले.