Download App

वांगचुक यांना चोहोबाजूने घेरले ! ते पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात; बांगलादेशचा दौरा; लडाखच्या डीजीपींचा धक्कादायक खुलासा

Sonam Wangchuk: वांगचुक हे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात होते. त्यांनी बांगलादेशचा दौरा केला असल्याचा धक्कादायक खुलासा डीजीपींनी केलाय.

  • Written By: Last Updated:

Ladakh DGP SD Singh Jamwal On Sonam Wangchuk: लडाखमधील पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांना हिंसा भडकविल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. त्यांच्या एनजीओला (NGO) परदेशातून फंडिंग होते होते. परंतु त्यात अनेकदा उल्लंघन झाल्याप्रकरणी त्यांचा एनजीओचा परवानाही केंद्र सरकारने रद्द केलाय. तर आता लडाखचे डीजीपी एसडी सिंह जमवाल (Ladakh DGP SD Singh Jamwal) यांनी वांगचुक यांच्याबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. वांगचुक हे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात होते. त्यांनी बांगलादेशचा दौरा केला असल्याचा धक्कादायक खुलासा डीजीपींनी केलाय.


मराठवाड्यातील नुकसानग्रस्तांना मदत करताना निकषाचा डोंगर; उद्धव ठाकरे यांचा सरकारवर घणाघात


पाच हजार लोकांच्या जमावाकडून हल्ला

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनानंतर लडाखमध्ये तरुणांनी आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर चार जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर वांगचुक यांच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली. आता डीजीपी जमवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले, आंदोलनामुळे हिंसा भडकली. पाच ते सहा हजार लोकांनी सरकारी कार्यालये, राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर हल्ला केला. त्यात चार लोकांचा मृत्यू झालाय. तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यात पोलिस, निमलष्करी दलाचे जवानही जखमी झाले.
(Ladakh DGP SD Singh Jamwal claims Sonam Wangchuk was in touch with Pakistan intels and visited Bangladesh)

मिस्टर फडणवीस भूतकाळ कशाला उकरता…, वर्तमान पाहा; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ टीकेवर राऊतांचा पलटवार


वांगचुक यांनी आंदोलन चिघळविले

24 सप्टेंबरला झालेली घटना चुकीची आहे. पर्यावरण कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या नावाखाली परिस्थिती चिघळवली. त्यात सोन वांगचुक हे एक आहेत. ते परदेशातील लोकांच्या संपर्कात होते. त्याबाबत चौकशी सुरू आहे. यात दोन जण पकडण्यात आले आहेत. कट रचण्यात सहभागी झाले होते. येथे नेपाळी नागरिक हे मजुरीसाठी आलेले आहेत. त्यांच्याही चौकशी केली जाणार आहे. आता लडाखमध्ये कर्फ्यू असून, तो हटविण्याचा प्रयत्न असणार आहे. वांगचुक हे पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांशी संपर्कात असल्याचा संशय आहेत. तसेच त्यांनी बांगलादेशचा दौरा केल्याचे जमवाल यांनी म्हटले आहे.

follow us