Download App

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, वकिलांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास सूट

Supreme Court Lawyers free to virtually Work : देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) मुख्य न्यायमूर्तींनी वकिलांना मोठी सूट दिली आहे. कोरोनाची (Corona virus) वाढती प्रकरणे पाहता सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (DY Chandrachud) यांनी वकिलांना वर्चुअली न्यायालयात हजर राहण्याची परवानगी दिली आहे. न्यायाधिश म्हणाले, ‘कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याचे वर्तमानपत्रातील रिपोर्ट्स दाखवतात. अशा परिस्थितीत वकिलांना वर्चुअली न्यायालयात हजर राहायचे असेल तर ते तसे करू शकतात किंवा प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहून काम करू शकतात.

आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात विक्रमी 4 हजार 435 लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. गेल्या 163 दिवसांच्या आकडेवारीत हा उच्चांक आहे. यासह, देशातील पॉझिव्टिव्ह रुग्णांची संख्या 23 हजार 91 वर पोहोचली आहे. पॉझिव्टिव्ह रुग्ण म्हणजे ज्या रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

NMACC इव्हेंटमध्ये शाहरुख-गौरीचं भांडण? सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या 24 तासात 15 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापैकी केरळ आणि महाराष्ट्रात प्रत्येकी चार जणांचा मृत्यू झाला. छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, पुद्दुचेरी आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एका कोरोनाबाधित व्यक्तीने आपला जीव गमावला आहे. संसर्गामुळे आतापर्यंत एकूण पाच लाख 30 हजार 916 मृत्यू झाले आहेत.

अहमदनगरमध्ये दोन गटात प्रचंड राडा; अफवावर विश्वास ठेवू नका, पोलीसांचे अवाहन

आकडेवारीवर नजर टाकली तर गेल्या चार दिवसांत मृत्यूचे प्रमाण 200 टक्क्यांनी वाढले आहे. दरम्यान, 40 जणांना आपला जीव गमवावा लागला. 1 एप्रिल रोजी पाच जणांचा मृत्यू झाला होता. 2 एप्रिलला 11, तीन एप्रिलला 9 आणि 4 एप्रिलला 14 जणांचा मृत्यू झाला.

Tags

follow us