NMACC इव्हेंटमध्ये शाहरुख-गौरीचं भांडण? सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 05T123643.277

Shah Rukh Khan-Gauri: मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नीता मुकेश अंबानी यांच्या क्लचरल सेंटरचा (Nita Mukesh Ambani Cultural Center) उद्धाटन सोहळा पार पडला. दोन दिवसांपासून हा सोहळा सुरु होता. (Shah Rukh Khan-Gauri) या सोहळ्याला बॉलिवूडबरोबच हॉलिवूडमधील कलाकरांनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.

 

View this post on Instagram

 

A post shared by SRK VIBE (@srkvibe2.0)


अभिनेता रणवीर सिंह, शाहरुख खान, वरुण धवन या कलाकारांनी NMACC ‘नीता मुकेश अंबानी क्लचरल सेंटर’ च्या उद्धाटन सोहळ्यावेळी विविध गाण्यांवर डान्स केला. या सोहळ्यामधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी (Gauri Khan) हे दोघे एकमेकांसोबत बोलताना दिसत आहेत.

शाहरुख आणि गौरी यांचा NMACC सोहळ्यामध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये दोघे बोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये शाहरुखचे हावभाव पाहून इव्हेंट दरम्यान शाहरुख आणि गौरीचं भांडण झालं होतं का? असा सवाल अनेक चाहत्यांना पडला आहे.

‘सर्किट’ मध्ये मिलिंद शिंदेंचा खलनायकी अंदाज

चाहत्यांचे कमेंट्स

गौरी आणि शाहरुखच्या व्हायरल व्हिडीओमुळे अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओला एका चाहत्यांनी कमेंट केली, ‘इतक्या लोकांसमोर एका पार्टीत तो तिच्यावर का ओरडत आहे, बऱ्याच स्त्रियांशी इतका चांगला वागणारा हा सज्जन माणूस आहे. हा व्हिडीओ बघून वाईट वाटत आहे.’ तर दुसऱ्या युझरने या व्हिडीओवर कमेंट केली, ‘तो गौरीवर चिडला आहे का?’ असे अनेक प्रकारचे सवाल त्याला त्या व्हिडिओवरून विचारले जात आहेत.

Tags

follow us