Download App

सैनिक म्हणजे टायगरला तुम्ही बांधू शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरून राहुल गांधींचा सरकारवर वार

लोकसभेत पहलगाम हल्ल्यावर चर्चा सुरू आहे. त्यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर थेट घणाघात केलाय.

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi on Pahalgam Attack In Lok Sabha : मी पाकिस्तान आणि चीनला वेगळे ठेवण्याचे म्हटले होते. सरकारचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरले. खरी लढाई चीनशी होती. पहलगाम हल्ल्यामागे मुनीरचा हात होता. (Lok Sabha) पाकिस्तान आणि चीनने हातमिळवणी केली. सरकारला वाटले की आपण पाकिस्तानशी लढत आहोत. प्रत्यक्षात आपण पाकिस्तान आणि चीन दोघांशीही लढत आहोत असं म्हणत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर थेट हमला चढवला. ते पहलगाम येथील झालेल्या हल्ल्यावरील चर्चेत लोकसभेत बोलत होते.

पाकिस्तानसमोर फक्त अर्ध्या तासातच शरणागती, राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

यावेळी राहुल गांधींनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. भारत सरकारने अवघ्या 30 मिनिटात माघार घेतली. याबाबत खुद्ध संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी माहिती दिली आहे असंही राहुल गांधी यावेळी म्हणालेत. तसंच, या घटनेनंतर आम्ही सरकार आणि सैन्याच्या पाठी खंबीरपणे उभे राहिलो. काही सीनियर नेत्यांनी आतातायी विधाने केल्याचं ऐकलं. आपण सर्व एकसंघपणे उभं राहिलो, याचा आम्हाला विरोधक म्हणून अभिमान आहे. जे झालं ते चुकीचं झालं. प्रत्येकाने निषेध नोंदवला असंही ते म्हणाले.

राजकीय काम करताना आपण संपूर्ण देशात जातो. लोकांना भेटतो. सैन्याच्या कुटुंबातील कुणाच्याही घरी जातो, जेव्हा त्यांच्या हातात हात मिळवतो, तेव्हा भारतीय सैन्याचा माणूस असल्याचं कळतं. हात मिळवताच कळतं हा टायगर आहे. त्याला हलवलं जाऊ शकत नाही. त्यांना कुठेही पाठवा तो देशासाठी लढायला, मरायला तयार असतो. टागरला संपूर्ण स्वातंत्र्य द्यावं लागतं. टागरला तुम्ही बांधू शकत नाही. टायगरकडून पूर्ण काम घ्यायचं असेल तर त्याला सूट द्यावी लागेल असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

follow us