Download App

भयंकर! प्रेयसीची हत्या, हातपाय बांधून मृतदेह 6 महिने फ्रिजमध्ये ठेवला

Boyfriend Killed Girlfriend Dead Body Found In Fridge : मध्य प्रदेशातील देवासमध्ये एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या (Crime News) करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवला होता. जून 2024 म्हणजेच सुमारे 6 महिने मृतदेह फ्रीजमध्ये ठेवण्यात आला होता. ज्या खोलीत फ्रीज ठेवला होता, त्या खोलीला लागून असलेल्या खोलीत आणखी एक कुटुंबही राहत होते. त्यांच्यामुळेच ही घटना उघडकीस (Boyfriend Killed Girlfriend) आलीय. आरोपी वेळोवेळी येऊन खोली तपासत होता. शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी दुपारी महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी काही तासांतच आरोपीला पकडलं. आरोपीने मित्रासोबत मिळून त्याचा लिव्ह इन पार्टनरचा खून केल्याची कबुली दिलीय.

…तरच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’ टिकेल; वकील माजिद मेमन काय म्हणाले?

उज्जैन येथे राहणारा संजय पाटीदार हा त्याची लिव्ह इन पार्टनर प्रतिभा उर्फ ​​पिंकी प्रजापती हिच्यासोबत या घरात राहत होता. मार्च 2024 मध्ये त्याने घर रिकामे केले, परंतु त्याचे काही सामान समोरच्या खोलीत (Dead Body Found In Fridge) ठेवले. त्याबदल्यात त्यांनी घरमालक धीरेंद्र श्रीवास्तव यांना भाडे देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर भाडे तर दिले नाहीच, उलट वेळोवेळी येऊन सामान घेऊन जात होते. बऱ्याच दिवसांपासून संजयने संपर्क साधला नाही, तसंच घरभाडे देखील दिलं नाही. त्यामुळे घरमालकाने कुलूप तोडून 10 डिसेंबर रोजी सकाळी ही खोली साफसफाईसाठी उघडली. तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. फ्रिजमध्ये पिंकीचा मृतदेह सापडला.

संजय शेजाऱ्यांशी फारसा बोलत नव्हता. यामुळे तो काय काम करतो, याची कोणालाच कल्पना नव्हती. फ्रीजमध्ये मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. संजय पाटीदारला अटक करण्यासाठी तात्काळ एक पथक उज्जैनच्या इंगोरिया येथे रवाना झालं. तेथून संजयला पकडून देवास येथे आणले असता, चौकशीत त्याने धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितलं की, तो आधीच विवाहित आहे. गेल्या 5 वर्षांपासून पिंकीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. पण, जानेवारी 2024 पासून पिंकी संजयवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती. त्यामुळे नाराज होऊन संजयने मित्रासोबत मिळून पिंकीचा गळा आवळून खून केला, त्यानंतर तिचे हात-पाय बांधून फ्रीजमध्ये ठेवले, अशी कबुली त्याने दिली आहे.

मी काय त्यांच्यासारखा रिकामटेकडा आहे का? फडणवीसांचा निशाण्यावर नक्की कोण..

पिंकीच्या कुटुंबीयांची अद्याप कोणतीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही. त्याचबरोबर आरोपी संजयची इतरही अनेक विषयांवर चौकशी केली जात आहे. त्याचा लुटारू टोळीशी संबंध असल्याचीही माहिती समोर येत आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात अनेक खुलासे होऊ शकतात. देवासचे एसपी पुनीत गेहलोत यांनी सांगितलं की, बीएनपी पोलिस स्टेशनच्या वृंदावन धाम कॉलनीतून घरातील रेफ्रिजरेटरमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो.

 

follow us