मी काय त्यांच्यासारखा रिकामटेकडा आहे का? फडणवीसांचा निशाण्यावर नक्की कोण..

मी काय त्यांच्यासारखा रिकामटेकडा आहे का? फडणवीसांचा निशाण्यावर नक्की कोण..

Devendra Fadnavis on Shivsena UBT : राजकारणात काहीही पक्क नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते. आता राज ठाकरे मित्र आहेत. उद्धव ठाकरे काही आमचे शत्रू नाहीत असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाने जहाल प्रतिक्रिया दिली होती. कुणी कुठे जायचं हे ठरवणारे देवेंद्र फडणवीस कोण? असा सवाल ठाकरे गटाने केला होता. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार पलटवार केला आहे. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी ठाकरे गटाच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारला. तुम्ही केलेल्या वक्तव्यावर ठाकरे गटाने अधिकृत भूमिका जाहीर केली. कुणी कुठे जायचं हे फडणवीसांनी ठरवू नये. त्यांनी आमचा पक्ष तोडलाय ही कुठली विचारसरणी असा सवाल ठाकरे गटाने केल्याचे पत्रकारांनी विचारले. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं मी माझं मत व्यक्त केलं. त्यांच्या वक्तव्यावर मत व्यक्त करायला मी बांधील नाही. ते रिकामटेकडे आहेत रोज बोलतात. मी काय रिकामटेकडा आहे का रोज बोलायला असा खोचक सवाल फडणवीसांनी ठाकरे गटाला विचारला.

‘फटके बसले असतील, म्हणून…’ राऊतांच्या घोषणेनंतर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

मविआ तुटेल की राहिल याकडे लक्ष नाही

महाविकास आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे दोन पक्षांनी जाहीर केलं आहे असे विचारले असता, त्यांनी एकत्रित लढावं, वेगळं लढावं. महाविकास आघाडी राहील की तुटेल याकडे आमचं लक्ष नाही. महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील सर्व निवडणुकांत जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत राहील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज ठाकरे की उद्धव ठाकरे?

नागपुरात एका कार्यक्रमात सीएम फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीच्या रॅपीड फायरमध्ये देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे की उद्धव ठाकरे? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर राजकारणात काहीही पक्क नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते. मग राज ठाकरे मित्र झाले. आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाहीत असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

अजित पवार की एकनाथ शिंदे?

मुलाखतीच्या रॅपीड फायरमध्ये देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार की एकनाथ शिंदे? असा प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, ‘माझ्यापुरतं विचारलं तर माझे दोघांशी देखील अतिशय चांगले संबंध आहेत. एकनाथ शिंदे यांच्याशी माझी जुनी मैत्री आहे. तसंच, अजित पवार यांच्यामध्ये एक राजकीय परिपक्तवता असल्यामुळे त्यांचे आणि माझे सूर मोठ्या प्रमाणात जुळतात, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

Video : मुलीची राजकारणात एन्ट्री ते घरातील शेवटचा राजकारणी कोण?; फडणवीसांच्या उत्तराने नवी चर्चा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube