Download App

मोठी बातमी! लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत पुन्हा बिघडली, रुग्णालयात दाखल

Lal Krishna Advani : भारताचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. बुधवारी रात्री

Lal Krishna Advani : भारताचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. बुधवारी रात्री त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. नुकतेच अडवाणी यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) दाखल करण्यात आले होते.

लालकृष्ण अडवाणी यांच्या तब्येतबाबत अपोलो हॉस्पिटलने (Apollo Hospital) एक निवेदन जारी केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली रात्री 9 वाजता अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

लालकृष्ण अडवाणी यांच्यावर डॉ. विनीत सुरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहे. मात्र त्यांना नेमका काय त्रास होत आहे याची माहिती अपोलो हॉस्पिटलने दिलेली नाही.

26 जून रोजी लालकृष्ण अडवाणी यांना नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना 27 जून रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले होते.

CBI ची मोठी कारवाई, NEET प्रकरणात आणखी एकाला अटक; वाचा सविस्तर

एम्स रुग्णालयात त्यांच्यावर युरोलॉजी विभागात उपचार सुरु होता. समोर आलेल्या माहितीनुसार, एम्स रुग्णालयात डॉ. अमलेश सेठ यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर युरोलॉजी विभागात उपचार सुरू होते.

30 मार्च 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला होता. अडवाणी यांनी 1986 ते 1990, 1993 ते 1998 आणि 2004 ते 2005 या काळात त्यांनी भाजपचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांनी 1942 मध्ये आरएसएसमध्ये स्वयंसेवक म्हणून सामील होऊन अडवाणींनी आपला राजकीयप्रवासाची सुरुवात केली होती.

follow us

वेब स्टोरीज